शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या 7 विद्यार्थ्यांना भारत सरकारची प्रत्येकी 50 हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर (Government of India announces scholarship of Rs 50,000 each to 7 students of Government Technical Institute Brahmapuri)

Vidyanshnewslive
By -
0
शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या 7 विद्यार्थ्यांना भारत सरकारची प्रत्येकी 50 हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर (Government of India announces scholarship of Rs 50,000 each to 7 students of Government Technical Institute Brahmapuri)

ब्रम्हपुरी :- येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत शिकत असलेल्या सात विद्यार्थ्यांना ‘भारत सरकारच्या प्रगती, स्वनाथ आणि सक्षम या तीन शिष्यवृत्त्या गुणवत्तेच्या निकषावर नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. ‘प्रगती शिष्यवृत्ती’ ही ‘तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण’ या उद्देशाने तंत्रशिक्षण पदविका तसेच पदवीचे शिक्षण घेत असलेल्या गुणवंत मुलींना, ‘स्वनाथ शिष्यवृत्ती’ ही पितृछत्र हरवलेल्या गुणवंत मुला-मुलींना तसेच ‘सक्षम शिष्यवृत्ती’ ही दिव्यांग विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्फत दिल्या जातात. प्रत्येकी 50 हजार रुपयांची प्रगती शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थीनी- इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगच्या कु. गायत्री प्रवीण चातारे व कु. शृंखल हंसराज सैजारे, कॉम्प्यूटर टेक्नोलॉजीच्या कु. वैष्णवी संजय गायकवाड व कु. श्रेया रामदास राऊत, सिव्हील इंजीनिअरिंगच्या कु. सानिका उद्धव नरोटे या असून सिव्हील इंजीनिअरिंगचे विद्यार्थी क्रिश देवेंद्र गोहणे यांना सक्षम आणि मायनिंग अभियांत्रिकीचे रितेश ज्ञानेश्वर चाचरकर यांना स्वनाथ अशा प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या शिष्यवृत्त्या जाहीर झाल्या आहे. या शिष्यवृत्त्या पदविकेच्या तीनही वर्षासाठी मिळतात. यासाठी प्रत्येक वर्षी संस्थेमार्फत अर्ज सादर करावा लागतो. सदर शिष्यवृत्ती प्राप्त होण्यासाठी संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. राजन वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मीनल मून यांनी समन्वय साधला. या यशासाठी सदर विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे डॉ. राजन वानखडे, प्र. प्राचार्य यांच्यासह विभागप्रमुख डॉ. आशिष बहेंडवार, प्रा. माधुरी नागदेवे, प्रा. जयंत बोरकर, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. हस्तीमल कुमावत, प्रा. मीनाक्षी मानलवार, प्रा. नितीन डोर्लीकर यांच्यासह सर्व अधिव्याख्याता व कर्मचारी यांनी अभिनंदन केले

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)