स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एन. डी. हॉटेल मध्ये जुगार अड्डयावर धाड, ३ लाख १० हजार ६१० रुपये रोखसह १० आरोपीना अटक (Local Crime Branch action, raid on gambling den in N. D. Hotel, 10 accused arrested with Rs 3 lakh 10 thousand 610 in cash)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एन. डी. हॉटेल मध्ये जुगार अड्डयावर धाड, ३ लाख १० हजार ६१० रुपये रोखसह १० आरोपीना अटक (Local Crime Branch action, raid on gambling den in N. D. Hotel, 10 accused arrested with Rs 3 lakh 10 thousand 610 in cash)


चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेने एन. डी. हॉटेल मध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून १० आरोपींना अटक केले. त्यांच्या जवळून ३ लाख १० हजार ६१० रुपये रोख जप्त केले. सदर कारवाई रविवारी २७ एप्रिल रोजी करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोहवा जय सिंह, चेतन गज्जलवार, पोअं. प्रशांत नागोसे, शशांक बादामवार, मिलींद जांभुळे, नितीन रायपुरे, किशोर वाकाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे. २७ एप्रिल २०२५ रोजी एन. डी. हॉटेल चंद्रपूर येथील रुम नंबर ११२ मध्ये काही इसम ५२ ताश पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या रुम मध्ये एकूण १० आरोपी ५२ ताश पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे मिळून आल्याने त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचेकडून एकूण ३ लाख १० हजार ६१० रुपये रोख रक्कम मिळून आल्याने त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)