चंद्रपूर हादरलं ! युवकांच्या टोळीकडून धारदार शस्त्राने भर वस्तीत पोलीस शिपाईची हत्या, एक पोलीस शिपाई गंभीर जखमी, उपचार सुरु (Chandrapur shook! A police constable was killed by a gang of youths in Bhar settlement with sharp weapons, one police constable was seriously injured, undergoing treatment)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर हादरलं ! युवकांच्या टोळीकडून धारदार शस्त्राने भर वस्तीत पोलीस शिपाईची हत्या, एक पोलीस शिपाई गंभीर जखमी, उपचार सुरु (Chandrapur shook! A police constable was killed by a gang of youths in Bhar settlement with sharp weapons, one police constable was seriously injured, undergoing treatment)


चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून आता गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला करण्याची धमक दाखवली आहे. चंद्रपूर शहरातील पठाणपुरा परिसरात टोळीकडून पोलिसांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या आणि बदनाम गल्ली म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या पठाणपुरा गेटच्या आत पिंक पॅराडाईज बारमध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते. त्यावेळी त्यांचा युवकासोबत वाद झाला.या वादाचे रूपांतर मारहानीत झाले त्यानंतर या युवकाने काही जणांना सोबत घेत पोलिसांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला असून दुसरे पोलीस कर्मचारी संदीप चाफले गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा खून झाल्यानंतर आरोपीनं स्वत: पोलीस ठाण्यात सरेंडर केल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या हल्ल्यात एका पोलिसाचा जागीच पडून मृत्यू झाला आहे तर दुसरा पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, हा परिसर अनेक अवैध हालचालीनीं बदनाम आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पोलिसांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आला असून आता पोलिसांसाठी ही संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहर आणि परिसरात गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगार कायद्याला धाब्यावर बसवून सर्रास गुन्हे करत आहेत. पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आला असून, आता पोलिसांसाठीही संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. " या हत्याकांडानंतर गुन्हेगारांना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दोन पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यापैकी पोलीस शिपाई चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. चाफले गंभीर जखमी आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या प्रकरणी दाद महाल वॉर्ड येथील तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. यात आणखी काही युवकांचा समावेश आहे. ते फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे." - मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)