जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, एलसीबीचे महेश कोंडावार यांची आर्थिक गुन्हे शाखा, भद्रावतीचे अमोल काचोरे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली (Transfers of police inspectors in the district, Mahesh Kondawar of LCB to financial crime branch, Amol Kachore of Bhadravati to local crime branch.)
चंद्रपूर :- एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखा) पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भद्रावती पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांची एलसीबीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमोल काचोरे यांची वर्षभरातील ही चौथी बदली आहे. वरोरा येथे कार्यरत असताना पोलीस कोठडी मध्ये आत्महत्या प्रकरण गाजले होते. तेव्हा त्यांची तडकाफडकी बदली केली होती. याशिवाय दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांना भद्रावती येथे पाठविण्यात आले असून, प्रभारी पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले निशिकांत रामटेके यांच्याकडे दुर्गापूर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती, अखेर शुक्रवारी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. एलसीबीचे प्रभारी महेश कोंडावार यांचा कार्यकाळ संपताच अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या पदासाठी दावेदारी मांडली होती. जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक एलसीबीमध्ये नियुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. या पदासाठी चार ते पाच पोलीस निरीक्षकांची नावे चर्चेत होती. मात्र, अखेर पोलीस अधीक्षकांनी भद्रावती पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नावावर शिक्का मारून बदलीचे आदेश जारी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या