आदीलाबाद :- अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडल मौलिक अधिकार समाजसेवा मंडल आदिलाबाद (तेलंगणा) द्वारा आयोजित "राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिवल- 2025" मध्ये दिनांक 23 फरवरी 2025 रविवार ला चंद्रपूर येथील इंजी नेताजी भरणे तसेच बल्लारपूर येथील आयुनी गायत्रीताई अनिल रामटेके यांना "डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न" राज्यस्तरीय पुरस्कार 2024-25, तेलंगणा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा. जोग्गु रामन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाल, सन्मान चीन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक, लेखक, कवी तसेच सामाजीक क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देणाऱ्याचे, प्रेरणादायी कार्य करणाऱ्या 40 गणमान्य व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन "राष्ट्रीय गुरु रविदास फेस्टिवल-2025" मध्ये या वर्षीचा "डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. आद इंजी नेताजी भरणे मागील 25 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेच्या माध्यमातून विविध पदावर कार्य करीत, केंद्रीय शिक्षक तथा चंद्रपूर जिल्ह्या अध्यक्ष पर्यंत काम करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार ची कार्य करीत आहेत.
आयुनी गायत्री ताई अनिल रामटेके यांचं विविध क्षेत्रात खूप मोलाचे योगदान आहेत. त्यागमुर्ती माता रमाई, माता सावित्रीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये 141 कार्यक्रम केलेत. त्याचे आंबेडकरी चळवळी मंध्ये खूप मोलाचे योगदान आहे. तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्म संस्थेच्या बल्लारपूर शहराच्या अध्यक्ष आहेत. केंद्रीय शिक्षिका तसेच समता सैनिक दलाच्या सहाय्यक डिव्हीजन ऑफिसर आहेत. बल्लारपूर शहरात आणि तालुक्यात समता सैनिक दलाचे 200 सैनिक तयार करून समता सैनिक दल ची मोठी फळी निर्माण केलेली आहे यांच्या कार्याची दखल घेऊन, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय ग्रुरु रविदास फेस्टिवल 2025 या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा अध्यक्ष आद मधु बावलकर,आदिलाबाद (तेलंगणा) हे होते या कार्यक्रमा करीता हजारो च्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता...
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या