चंद्रपूर :- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रिशिप योजनेचे अर्ज 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयास पाठविण्याचे आवाहन सर्व महाविद्यालयांना करण्यात आले आहे. सद्यस्थितीत चालु शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता महाडिबीटी प्रणालीद्वारे अनूसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता भा.स.शि. फ्रीशिप, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना या पाच योजनांचे नवीन व नुतनीकरणाच्या अर्जाची महाडीबीटी प्रणालीद्वारे स्विकृती सुरू झाली त्यामध्ये प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती (फ्रीशिप) या योजनांकरीता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चालु शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये केवळ 83 टक्के व 72 टक्के अर्ज नोंदणीकृत झालेले आहेत. महाडीबीटी प्रणालीवर ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज नोंदणी केलेली नाही, मागील वर्षातील अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहे, अशा अर्जदारास त्यांचा अर्ज सादर करण्याबाबत महाविद्यालयाद्वारे वेळोवेळी लेखी सूचना निर्गमित कराव्यात. तसेच विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज सादर न केल्यास सदर योजनेच्या लाभापासून अर्जदार वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील. तसेच महाविद्यालयाने प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्जाचे नोंदणी होईल या दृष्टिने प्रयत्न करावेत.
महाडीबीटी प्रणालीवरील द्वितीय, तृतीय व चर्तुथ वर्षाकरिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुतनीकरणाच्या अर्जाकरिता प्रथम प्राधान्य देऊन सदर अर्ज प्राचार्यांनी निकाली काढावेत. प्रथम वर्षातील ज्या अभ्यासक्रमांचे संबंधित शैक्षणिक यंत्रणा/ विभागामार्फत महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क मंजुर झालेले आहे, अशा महाविद्याल्यांनी नविन अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही तात्काळ करावी. त्याचप्रमाणे सदर शुल्क रचना मंजुरीस्तव प्रलंबित असल्यास संबंधित महाविद्यालयाने सक्षम यंत्रणाशी पाठपुरवा करून शूल्क रचना मंजूर करावी. महाडीबीटी पोर्टलवरील सन 2021-22, सन 2022-23 आणि सन 2024-25 मधील महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत सर्व दस्ताऐवजांची पडताळणी, अभ्यासक्रम शुल्क, आधार बँक लिंकस्थिती, इत्यादी बाबींची खातरजमा करून महाविद्यालयाचे लिपीक व प्राचार्य लॉगीनमधुन पुढील मंजूरीकरिता सर्व अर्ज 8 फेब्रुवारी 2025 पर्यत जिल्हा कार्यालयास तात्काळ पाठवावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्तता होऊ शकत नाही व उपरोक्त योजनेस अपात्र आहेत, अशा विद्यार्थ्याचे अर्ज विद्यार्थी लॉगीनला परत करण्यात यावेत. असे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ठेवू नये. महाविद्यालय स्तरावरील दुसऱ्या हप्त्यासाठी प्रलंबित असलेल्या अर्जाबाबत विद्यार्थ्यांची द्वितीय सत्राची उपस्थिती अद्यावत करून प्रलंबित अर्ज महाविद्यालयाचे लिपीक व प्राचार्य यांच्या लॉगिन द्वारे अर्ज मंजूरीसाठी विभागास पाठवावेत. तसेच महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहून विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहिल, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या