धक्कादायक ! चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर हल्ला, 34 खातेदाराकडून 3 कोटी 70 लाख रु वर डल्ला (Shocking ! Cyber ​​attack on Chandrapur District Central Cooperative Bank, extortion of Rs 3 crore 70 lakh from 34 account holders)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर हल्ला, 34 खातेदाराकडून 3 कोटी 70 लाख रु वर डल्ला (Shocking ! Cyber ​​attack on Chandrapur District Central Cooperative Bank, extortion of Rs 3 crore 70 lakh from 34 account holders)


चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून RTGS केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकच्या माध्यमातून होते लाभार्थी च्या खात्यात जमा होते. अशातच 7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसात 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक 'मेकर आणि चेकर' आहेत. तर बेनिफिशरी बँक येस बँक असल्याचे सांगितलं जातंय. मात्र आरटीजीएस (RTGS) केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने संशय आला. दरम्यान चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर यातील गुन्हेगारांना अटक करण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांपुढे असणार आहे. या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारल्याची माहिती पुढे आली आहे. यात तब्बल 3 कोटी 70 लाख रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी (Crime News) डल्ला मारला असल्याचे पुढे आले आहे. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक व्यवहारांमध्ये सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर रक्कम वळते केल्याचे सांगितलं जातंय. बँकेत पैसे जमा करायला गेलेल्या व्यक्तीच्या कारमधील 2 लाखाची रोकड पळविण्याची घटना नागपूर लगतच्या वानाडोंगरी (महाजन वाडी) येथील हिंगणा मार्गावर असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या समोर घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात धास्ती पसरली आहे. भाऊराव काळे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील तूर -कपाशी हे पीक विकले होते. त्याचेच आलेले अडीच लाख रुपये घेऊन ते ट्रान्सपोर्टच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी घरून निघाले. त्यांच्या सोबत त्यांचा एक मित्र सुद्धा होता. हे दोघेही हिंगणा येथे काही काम उरकून नागपूरकडे जाताना वाटेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये त्यातील पन्नास हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी त्यांनी काढले व उर्वरित दोन लाख ही रक्कम कारच्या समोर असलेल्या हॅन्डब्रेक जवळ तशीच ठेवून बँकेत गेले. दरम्यान, काही वेळानंतर काम आटपून बाहेर पडले. तर त्यांना चालकाच्या दुसऱ्या बाजूच्या दाराची काच फुटलेली दिसली आणि आतील पैसेसुद्धा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लागलीच पोलीसाना सूचना दिली. या घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)