नागपूरच्या गुरु-शिष्याच्या जोडीने केली कमाल, त्यांच्या संशोधनाला अमेरिका सह भारताचही पेटंट मिळाल, आता 15 मिनिटांत होणार कॅन्सरचं निदान (Guru-disciple pair of Nagpur did Kamal, their research will get patent in America and India, now cancer will be diagnosed in 15 minutes)
नागपूर :- आता कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहता केवळ पंधरा मिनिटांत त्याला भविष्यात तोंडाचा कर्करोग होणार आहे किंवा नाही, याचे खात्रीलायक निदान करणारे हे तंत्रज्ञान आपल्या भारतात विकसित करण्यात आले आहे. अशा पद्धतीचं हे जगातील पहिले तंत्रज्ञान आहे. यामुळे आता कॅन्सर होण्याच्या आधीच त्याचे नेमके निदान शक्य झाले आहे. नागपूर येथील एका प्राध्यापक आणि विद्यार्थ्याच्या जोडीने ही कमाल केली असून त्यांच्या संशोधनाला अमेरिकेचे पेटंट आणि भारतीय पेटंट देखील मिळालं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक देवव्रत बेगडे आणि विद्यार्थी शुभेन्द्रसिंग ठाकूर यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. आता नागपुरात एका शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या जोडीनं असं भन्नाट तंत्रज्ञान विकसित केलंय, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला भविष्यात कर्करोग होणार की नाही, हे आधीच कळणार आहे. हे तंत्रज्ञान मुख कर्करोगाचं निदान करणार आहे. अवघ्या १५ मिनिटांत लाळेची (Saliva) चाचणी करून मुख कर्करोगाचे निदान होणार आहे. हे कर्करोगाच्या विरोधातल्या लढाईतील एकं अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे. त्यामुळे हा आजार झाल्यास उपचाराअभावी अनेकांना आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमवावं लागतं. या नवीन संशोधनामुळे जगभरात लाखो मानवी प्राण वाचवण्यात यश मिळू शकेल, अशी खात्री तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खरं तर, कर्करोगाची लक्षणे आणि निदान उशिरा होत असल्याने वेळ, पैसे आणि कित्येक वेळा जीवही गमवावा लागतो. पण वेळीच कॅन्सरचं निदान झालं तर कॅन्सरपासून हमखास मुक्ती मिळू शकते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या