बल्लारपूर :- ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय विकास संस्था, बल्लारपूर संचलित KGN पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील हुशार आणि उच्च शिक्षित मुलींचा सत्कार केला, ज्यामध्ये अलीकडे सोनी वाहिनीवर लोकप्रिय टीव्ही शो कौन बनेगा करोडपती (KBC) प्रसारित झाला. होस्ट प्रसिद्ध सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरुद्ध हॉट सीटवर पोहोचणारी सामाजिक कार्यकर्ते महमूदखान पठाण यांची मुलगी जमजमने, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत यश संपादन केलेली फिरदोस सय्यद, गोंडवाना विद्यापीठातून भौतिकशास्त्रात भारताचे महामहिम राष्ट्रपती दौपदी मुर्मू च्या हस्ते सवर्णपदक मिळवणारी सदफ अन्सारी, आणि रसायनशास्त्र विषयात विद्यापीठातील टॉपर कुदसिया सिद्दीकी यांच्या शिक्षक आमदार सुधाकरजी अडाबळे सर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, फुलांचा गुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक शेख महेमूद होते. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता करमणकर, उपमुख्याध्यापिका सीमा माकडे, शाळेच्या प्रशासक झीनत खान उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनीही शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या