स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने मोफत वैद्यकीय शिबीर संपन्न, अनेक रुग्णांनी घेतला लाभ (A free medical camp was held on the occasion of the birth anniversary of Swami Vivekananda and Rashtramata Jijau, many patients benefited)

Vidyanshnewslive
By -
0
स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने मोफत वैद्यकीय शिबीर संपन्न, अनेक रुग्णांनी घेतला लाभ (A free medical camp was held on the occasion of the birth anniversary of Swami Vivekananda and Rashtramata Jijau, many patients benefited)


बल्लारपूर :- स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंती व राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच बल्लारपूर क्रीडा बहुउद्देशीय संस्था व सर्वोदय विद्यालय बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर शहरातील गांधी वार्ड येथील सर्वोदय विद्यालयात काल रविवारी (दि. 12) सकाळी 9 ते 3 या वेळेत मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य शिबिरात गुडघ्याची तपासणी, बीपी, ईसीजी, मधुमेह, हाडांची तपासणी, हाडे दुखणे तपासणी करण्यात आले. या मोफत आरोग्य शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप वरघणे आणि डॉ. अप्रितम दीक्षित तपासणी करीत होते. 

 
          या मोफत वैद्यकीय शिबिराच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर, कु गजबे मॅडम मुख्याध्यापक सर्वोदय विद्यालय बल्लारपूर डॉ अप्रितम दीक्षित, डॉ. प्रदीप वरघणे, डॉ. रजत मंडल, प्रभारी प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय बल्लारपूर, मा. प्रमोद आवते यांची विचार पिठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहारासोबत व्यायाम करणे गरजेचे असते या मोफत आरोग्य शिबिराची नोंदणी शिबीर स्थळी सुरु होती. वृत्त मिळे पर्यंत या शिबिरात शेकडो रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती आहे यावेळी सर्वोदय विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका प्राध्यापक, एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)