सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक - जिल्हाधिकारी विनय गौडा (Voter is an important factor for a healthy democracy - Collector Vinay Gowda)

Vidyanshnewslive
By -
0
सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक - जिल्हाधिकारी विनय गौडा (Voter is an important factor for a healthy democracy - Collector Vinay Gowda)


चंद्रपूर :- निवडणूक हा लोकशाहीचा पाया असून मतदान करणे हा आपला सर्वोच्च अधिकार व कर्तव्य आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विकासाला चालना व गती प्राप्त होते. त्यामुळे देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे गरजेचे आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक असल्याचे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले. नियोजन भवन येथे 15 व्या “राष्ट्रीय मतदार दिनाच्या” कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) संजय पवार, उपजिल्हाधिकारी अतुल जटाळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, तहसिलदार विजय पवार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच नवमतदारांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, देशाच्या लोकशाहीचा केंद्रबिंदू असणाऱ्या मतदारांसाठी “राष्ट्रीय मतदार दिवस” साजरा करण्यात येत आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदारांनी जागृत राहून मतदान करावे. जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी, लोकशाही आणि देश पुढे नेण्यासाठी प्रत्येक मतदारांचा सहभाग आवश्यक आहे. आता नवमतदारांना वर्षातून चार वेळा ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे आणि लोकशाहीतील आपला सर्वात महत्वाचा असा मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन देखील जिल्हाधिकारी श्री.गौडा यांनी केले. प्रास्ताविकेत बोलतांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी म्हणाले, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. 


              सन 2011 पासून संपुर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. मतदार विशेषत: युवा मतदारामध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदार यादीत नाव नोंदविण्याकरीता प्रोत्साहित करणे, त्यांची नाव नोंदणी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मतदार दिवसाची थीम “Nothing like voting, I vote for sure” अशी आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. चौधरी म्हणाले. तत्पुर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सपना पिंपळकर तर आभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांनी मानले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षक व बीएलओंचा सत्कार 2024 निवडणुकांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्र पर्यवेक्षक व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. व उपस्थित करण्यात आला. यामध्ये, पर्यवेक्षक पंचशिला भोयर, मनोज पुलगमकर, नरेश गेडाम, रतिराम चौधरी, नंदकिशोर वर्धलवार, अजय निखाडे तर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी प्रदीप पायघन, प्रकाश राठोड, सुनिता अडबाले,संकेत जयकर, प्रशांत गटलेवार, कृष्णमाला मडावी, रुपेश टिकले, विरेंद्र सुखदेवे, संध्या बोकारे, निरंजन शास्त्रकार, अनिल वाघमारे, ज्योती आसनपल्लीवार आदींचा समावेश होता.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)