महात्मा फुले महाविद्यालयात इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या सयुक्त माध्यमातून विविध उपक्रमातून " राष्ट्रीय मतदार दिन " साजरा (Mahatma Phule College celebrated "National Voter's Day" through various activities jointly organized by the Department of History and Political Science)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन या निमित्ताने महाविद्यालयातील इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त माध्यमातून विविध उपक्रमा द्वारे " राष्ट्रीय मतदार दिन " साजरा करण्यात आला.

       या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये मतदान व निवडणूक प्रक्रियेत जाणीव जागृती व्हावी या अनुषंगाने निबंध स्पर्धा व गीत गायन चे आयोजन करण्यात आले ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता तसेच 25 जानेवारी रोजी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी " मतदान शपथ " घेण्यात आली.

        ज्यात आपलं कर्तव्य पार पाडताना निष्पक्ष रित्या आपलं मतदान करून लोकशाहीचा अधिकार बजावेल अशी प्रतिज्ञा घेतली. यावेळी डॉ. किशोर चौरे(इतिहास विभाग), डॉ. बादलशहा चव्हाण, प्रा. शुभांगी भेंडे, [प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, (राज्यशास्त्र विभाग)], प्रा. जयेश गजरे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)