बल्लारपूर :- आचार्य बालशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणजे 06 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो लोकमान्य टिळकांच्या केसरी पासून तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या बहिष्कृत भारत व मुकनायक वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन कार्य केले. काळानुरूप प्रसार माध्यमाच्या कक्षेत बदल झाला असून प्रिंट मीडिया सोबत इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया च्या माध्यमातून जलद गतीने बातम्याचा ओघ जनसामान्य पर्यंत पोहोचत असला तरी आजही प्रिंट मीडियाच महत्व अधोरेखित आहे.
याच अनुषंगाने 6 जानेवारी हा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या अंतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा बल्लारपूरच्या वतीने शहरातील स्मारक असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रयतचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष मनोहर दोतपेल्ली, तालुका सचिव दिपक भगत, वसंत मून, देवानंद देशभ्रतार, मिलिंद पुणेकर, निळकंठ मजगवळी, लखपती घुगलोत, गौतम कांबळे, संतोष बडकेलवार, गणेश टोंगे यांची उपस्थिती होती. तर न्यू युवा महाराष्ट्र पत्रकार संघा च्या वतीने ब्ल्यांकेट वितरण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून न्यू युवा महाराष्ट्र पत्रकार संघ बल्लारपूर च्या वतीने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे रूग्णांना ब्ल्यांकेटचे वितरण करण्यात आले. मा. डॉ. गजानन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरवात कऱण्यात आली यावेळी इंजिनीयर राकेश सोमानी संघाचे अध्यक्ष, सुमित डोहने सामाजिक कार्यकर्ते, प्रशांत रणदिवे संघाचे उपाध्यक्ष , सुजय वाघमारे संघाचे सचिव, आरिफ भाई, यांची उपस्थिती होती.
तसेच प्रादेशिक युवा पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक विश्राम गृहात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सदर' पत्रकारिता हे एक व्रत असून त्याचा जबाबदारीने उपयोग करावा व त्या माध्यमातून सामजिक प्रबोधन आणि जनजागृती घडावी 'असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेंद्र आर्य,मार्गदर्शक अनेकश्वर मेश्राम, उपाध्यक्ष प्रशांत भोरे, सचिव सुभाष भटवलकर,कोषाध्यक्ष घनश्याम बुरडकर,सह सचिव विवेक गडकर, वैभव मेश्राम, आशिष खाडे,प्रमोद येरावार यांनी अथक परिश्रम केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या