चंद्रपूर -: मा. सा. कन्नमवार रौप्य महोत्सव निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 10 जानेवारीला चंद्रपूरात येत असून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे पहिल्यांदाच चंद्रपूरात आगमन होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आयोजन समिती त्यांचे नियोजन करत आहे. मात्र, प्रशासनानेही कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी समन्वयाने उत्तम नियोजन करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस कलमी सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक सदर्शन मुमक्का, मनपा आयुक्त विविन पालिवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. एस कुंभार, सहयक पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, वाहतुक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील, शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरे, रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ससिफ राजा शेख, महोत्सव समीतीचे अध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल पावडे, श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे सचिव अजय जयसवाल यांच्यासह संबधित विभगाचे अधिकारी श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूरचे सुपुत्र मा. सा. कन्नमवार यांच्या जयंतीनिमित्त शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चंद्रपूरचे सुपुत्र आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहावी, अशी विनंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निश्चित केले असून महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. 10 जानेवारीला या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.30 वाजता लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येणार आहे. तर 9 वाजता वसंत भवन येथून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांचे मोरवा विमानतळ येथे आगमन होताच ते वरोरा नाका मार्गे श्री माता महाकाली मंदिर येथे जाणार असून मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते प्रियदर्शनी येथे आयोजित मा. सा. कन्नमवार शतकोत्तर सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या संदर्भात पूर्व नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आयोजक आणि प्रशासनाने समन्वय ठेवत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दक्षता घेत अंतिम राहिलेली कामे जलदगतीने पूर्ण करावी. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन, कार्यक्रम स्थळी सजावट, सुविधा आणि शिस्तबद्ध आयोजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच वेळेत सर्व तयारी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या