दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, 5 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात निवडणुका तर 8 फेब्रुवारीला निकाल (Delhi assembly election bugle sounded, single phase elections on 5th February and results on 8th February)
वृत्तसेवा :- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत दिल्लीच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली. दिल्लीतील 70 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून निकाल 8 फेब्रुवारीला येणार आहेत. राजीव कुमार यांनी यावेळी बोलताना, “मी सर्व मतदारांना लोकशाहीच्या महान उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करतो. 2024 मध्ये 8 राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या. आम्ही ९९ कोटी मतदार असणार आहोत. ही आनंदाची बाब आहे. त्यानंतर आता नव्या वर्षातील ही पहिली निवडणूक आहे त्यासाठी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत येत्या 5 फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात मतदान पार पडणार आहेत. तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार झाले. अनेक नवतरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. आगामी काळात देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी हे टक्केवारी अधिक वाढत जाईल. किंबहुना प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप होतच राहतात. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. यंत्रणात चूक असेल, वैयक्तिक चूक असेल तर दाखवा तत्काळ कारवाई करू. सोबत ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असे कोर्टानेही म्हटले आहे. त्यामुळे वायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळावरून आणि ईव्हीएम वरून लक्ष्य करण्यात आले त्यावर शायरीच्या अंदाजात उत्तर दिले. त्यांनी “सब सवाल अहमियत रखते हैं जवाब तो बनता है, आदतन कलमबंद जवाब देते रहे, आज तो रू-ब-रू भी बनता है क्या पता हम कल हो न हो, आज जवाब तो बनता है” म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांवर भाष्य केले. 70 सदस्यीय दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे झाले तर 2020 मध्येही दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला होता. सलग 15 वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसला गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असून एकही जागा जिंकता आलेली नाही. 2020 च्या निवडणुकीत AAP ने 70 पैकी 62 जागा जिंकल्या, तर भाजपने 8 जागा जिंकल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे:
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना कधी निघणार?- 10 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- 17 जानेवारी
उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- 18 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी
मतदानाची तारीख- 5 फेब्रुवारी
निकालाची तारीख- 8 फेब्रुवारी
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या