एमपीएससी च्या पॅटर्न बदलामुळे एमपीएससी सह युपीएससी चीही तयारी करणे शक्य, नव्या संधी उपलब्ध असणार (Due to the change in the pattern of MPSC, it will be possible to prepare for UPSC along with MPSC, new opportunities will be available)
मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न यूपीएससी परीक्षेशी मिळताजुळता केल्याने आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास करून यश मिळवणे शक्य होणार आहे. राज्य सेवा आयोगाने वर्ष २०२५ पासून परीक्षा पद्धतीचा नवा पॅटर्न जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आता मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह ऐवजी डिस्क्रीप्टव्ह प्रकारची असेल. यूपीएससीप्रमाणे ही पद्धत असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी यूपीएससीची तयारी करत असतील त्यांना एमपीएससी परीक्षा देणे देखील सोपे होणार आहे.एमपीएससी परीक्षेत पूर्वीचा मराठी व इंग्रजी व्याकरणाचा पेपर आता असणार नाही. त्याऐवजी नवे इपिक्सचा पेपर असणार आहे. आता उमेदवारांना एमपीएससी परीक्षेत निबंध लेखनाचा पेपर पूर्वीप्रमाणे असणार आहे.जनरल स्टडीजमध्ये एकूण चार पेपर असतील. त्यामध्ये एक पेपर हा इतिहास, सामाजिक शास्त्रे, समाजशास्त्र व जगाचा इतिहास या बाबींशी जोडलेला असेल. जीएस दोन हा पेपर राज्यघटना, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध, अंतर्गत सुरक्षा या बाबींशी संबंधित असेल. जीएस तीन पेपर आर्थिक विकास व नियोजन, अर्थव्यवस्था, शेती व्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबधित आहे. जीएस चार पेपर इथिक्स, मूल्ये, प्रशासकीय मूल्ये या विषयांशी संबंधित असणार आहे. तसेच ऐच्छिक विषयांत उमेदवारांना त्यांनी पूर्ण केलेल्या शिक्षणक्रमांशी जोडलेला अभ्यासक्रम असेल. त्यानंतर जनरल स्टडीजच्या एकूण चार प्रश्नपत्रिका या वर्णनात्मक लेखन प्रकारात असतील. त्यामुळे या विषयाचा अभ्यास यूपीएससी परीक्षेसारखाच असणार आहे. किंबहुना यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना एमपीएससी परीक्षेत यश मिळवणे सोपे होणार आहे. लेखनाचा पॅटर्न सारखाच असल्याने हा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. नव्या पॅटर्नमुळे अभ्यासासाठीचा आत्मविश्वास वाढणार आहे. दोन्ही परीक्षांची संधी एकाच पद्धतीने हाताळणे शक्य होणार आहे. त्यासाठी अधिक चांगली तयारी करता येऊ शकेल. हा बदलता पॅटर्न आता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या तयारीसाठी पूरक ठरणार आहे. तसेच यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससी क्रॅक करणे शक्य होणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या