क्रीडा स्पर्धेतील पराभवातून वाद शाळेच्या परिसरात शिरून पालकाची विद्यार्थिनीला मारहाण बल्लारपूरातील कन्या विद्यालयातील प्रकार, पालकावर गुन्हा दाखल (Argument after defeat in a sports competition, a parent assaulted a student by entering the school premises in a girl's school in Ballarpur, a case was registered against the parent.)
बल्लारपूर :- जानेवारी महिना म्हण्टलं वार्षिक स्नेहसंमेलन व शालेय क्रीडा स्पर्धा व या क्रीडा स्पर्धातुन कुणाचा विजय तर कुणाचा पराभव मात्र स्पर्धेतील पराभवातून वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले, घडलेला प्रकार तासानंतर पालकास कळला. त्यानंतर त्या पालकाने रागाच्या भरात वर्गखोली गाठून दोन-तीन मुलींना मारहाम केली. यात एका मुलीला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी मो. आशिक मो. कल्लू सेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार बल्लारपूर शहरातील जव्हेरी कन्या विद्यालयात मंगळवार घडला. या प्रकरणात शाळेच्या प्राचार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला असून त्यांना तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. येथील जव्हेरी कन्या विद्यालयात मंगळवारी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नववी आणि दहावीच्या वर्गात कबड्डीचा सामना झाला. यात एक संघ जिंकला जिंकलेल्या संघातील एका खेळाडूने पराभूत संघातील खेळाडूची गमतीत चीड काढली. यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले या मारहाणीची माहिती तासाभरानंतर एका पालकाच्या कानावर पडली. मो. आशिक मो. कल्लू शेख हा रागारागाच जव्हेरी कन्या शाळेला आला. त्याने वर्गात शिरून दोन ते तीन अल्पवयीन मुलींना मारहाण केली. यात एका मुलीला गंभीर दुखापत झाली. घटनेच्या वेळी परिसरात प्राचार्य, शिक्षिका व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. मात्र, प्राचार्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप वर्गातील मुलींनी केला आहे. घडलेल्या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई आणि प्राचार्या आसमा खान खालिदी यांना बडतर्फ करावे, अशी मागणी करीत विद्यार्थी आणि पालकांनी मंगळवारी रात्री पोलिस स्टेशन गाठले. यावेळी पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठा जमाव निर्माण झाला. या प्रकरणात पालक मो. आशिक मो. कल्लु शेख याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात प्राचार्या आसमा खान खालिदी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता त्यांनी प्रसार माध्यमांना शाळेत प्रवेश नाकारला. बुधवार (ता. २२) शाळेबाहेर विद्यार्थी आणि पालकांचा जमाव होता. यावेळी आरोपी आणि प्राचार्यावर कारवाईची मागणी केली. याविषयीं पोलीस कारवाई संदर्भात माहिती घेतली असता शाळेच्या आवारात घुसून अल्पवयीन विद्यार्थिनींना मारहाण करण्याचा प्रकार गंभीर आहे. आरोपींवर स्पेशल अक्टखाली गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढे योग्य ती कारवाई करू. - श्याम गव्हाणे, पोलिस निरीक्षक बल्लारपूर. यांनी प्रसार माध्यमाना दिली
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या