चंद्रपूरमधून होईल ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५ गुरुवारपासून उद्यापासून, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उदघाटन (Conch shelling against global warming, International Conference on Climate Change-2025 to be held from Chandrapur from tomorrow, Governor C.P. Inauguration by Radhakrishnan)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरमधून होईल ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५ गुरुवारपासून उद्यापासून, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उदघाटन (Conch shelling against global warming, International Conference on Climate Change-2025 to be held from Chandrapur from tomorrow, Governor C.P. Inauguration by Radhakrishnan)


चंद्रपूर - १६, १७ व १८ जानेवारी २०२५ ला चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’च्या निमित्ताने चंद्रपूरमधून ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद केला जाईल. सी फॉर चंद्रपूर हे सी फॉर क्लायमेट चेंजच्या संदर्भात धोरण तयार करण्यात मोठे योगदान देईल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (सोमवार, दि. १३ जानेवारी) व्यक्त केला. या परिषदेत पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे, असे आवाहन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. सोमवार, दि. १३ जानेवारीला आ. श्री. मुनगंटीवार यांनी तयारीचा आढावा घेतला. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये १७० हून अधिक संशोधन पेपर्सचे सादरीकरण, जागतिक हवामान तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण व युवा नेतृत्वाला प्रोत्साहन, आदी उपक्रम होणार आहेत. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी निश्चित महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. वीस कलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आढावा बैठकीला एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव (आभासी पद्धतीने), प्रभारी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले व अधिकारी उपस्थित होते. १६ जानेवारीला दुपारी ३ वाजता महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरण बदलावर चिंतन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात तात्कालिक नव्हे तर स्थायी स्वरुपाचे कार्य आवश्यक आहे. केवळ चंद्रपूरच्या नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील वातावरणात होणारे बदल, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण संवर्धन या संदर्भात राज्यामध्ये स्थायी समिती तयार करण्याचा निर्णय झाला आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 
             या परिषदेचे नियोजन मी वनमंत्री असतानाच झाले होते. त्याचे उद्घाटन येत्या १६ जानेवारीला होत आहे. यामध्ये महामहीम राज्यपालांसह जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासारखे पर्यावरण तज्ञही सहभागी होणार आहेत. अमेरिकेसह बाहेरील देशातूनही पर्यावरण तज्ञांचा यामध्ये समावेश असणार आहे, अशी माहितीही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. आमच्यासह देशातील सर्व पर्यावरण प्रेमी, एनएनडीटी विद्यापीठ एकत्र येऊन सरकारला पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात एक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करू. यात केवळ वृक्षारोपण नव्हे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने व्यापक कार्य करण्याचा विचार मांडण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यामधील सर्व पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना जोडण्यासाठी एक मोबाईल अप तयार करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत गांभिर्य असलेल्या संस्था व व्यक्ती सहभागी होऊ शकतात. असेही ते म्हणाले. वन अकादमीत होणार आंतरराष्ट्रीय परिषद चंद्रपूर मधील वन अकादमी येथे तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’चे आयोजन दिनांक १६ ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांनी सिटी युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका यांचे शैक्षणिक सहकार्य लाभले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)