AID- ऍडव्हांटेज विदर्भ परिषद औद्योगिक विकासाची आणि युवकांच्या भविष्याची दिशा निश्चित करणारा मार्ग - आमदार किशोर जोरगेवार (AID-Advantage Vidarbha Parishad a way to set direction for industrial development and future of youth - MLA Kishore Jorgewar)

Vidyanshnewslive
By -
0
AID- ऍडव्हांटेज विदर्भ परिषद औद्योगिक विकासाची आणि युवकांच्या भविष्याची दिशा निश्चित करणारा मार्ग - आमदार किशोर जोरगेवार (AID-Advantage Vidarbha Parishad a way to set direction for industrial development and future of youth - MLA Kishore Jorgewar)


एम आय डी सी असोसिशन च्या वतीने AID- ऍडव्हांटेज विदर्भ परिषदेची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन

चंद्रपूर :- AID- ऍडव्हांटेज विदर्भ परिषद 2025 संदर्भातील माहिती. देण्यासाठी एम आय डी सी असोसिशन च्या वतीने असयोजित हा कार्यक्रम एक औपचारिकता नसून, आपल्या प्रदेशाच्या औद्योगिक विकासाची आणि युवकांच्या भविष्याची दिशा निश्चित करणारा मार्ग असून आयोजित होणार असलेल्या AID- ऍडव्हांटेज विदर्भ परिषदेत चंद्रपूर जिल्ह्यलाही दालन उपलब्ध व्हावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे2025 मध्ये नागपूर येथे आयोजित होणाऱ्या AID- ऍडव्हांटेज विदर्भ परिषद संदर्भात माहिती देण्यासाठी एम आय डी सी असोसिशन च्या वतीने चांदा क्लब येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग वाढी संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्यात. या प्रसंगी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्या बद्दल आमदार किशोर जोरगेवार यांचा एम आय डी सी असोसिशन च्या वतीने वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी एम आय डी सी असोशिएशन चे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, किर्तीवर्धन दीक्षित, उद्योजक कल्पना पालीकुंडावार, विनोद दत्तात्रे, अशोक जीवतोडे यांची प्रमुख्यतेने उपस्थिती होती. AID फोरम च्या माध्यमातून रोजगार निर्मिती, औद्योगिक प्रगती आणि आर्थिक स्थैर्य साध्य करण्याचे कार्य अविरत सुरू आहे. या संदर्भात, "[खलाशी औद्योगिक महोत्सव]" सारख्या कार्यक्रमांद्वारे नवीन व्यासपीठ उभारले जात आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून औद्योगिक प्रगतीस नवा आयाम देणे, युवकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस गती देणे. हा यावर्षी 2025 मध्ये नागपूर येथे आयोजित होणाऱ्या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी इंडस्ट्रीयल एक्स्पो, बिझनेस कॉन्क्लेव्ह, आणि इन्व्हेस्टमेंट समिट यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यातून उद्योजक, तंत्रज्ञ, आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये संवाद घडूवून आणण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आला होता.


     या कार्यक्रमात बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, सर्वजण एकत्र येऊन औद्योगिक विकासाला गती द्यावी. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, रोजगार निर्मितीच्या नव्या संधी, आणि समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. AID फोरम च्या पुढाकाराने आणि आपल्या सहकार्याने, आपल्या प्रदेशाचा औद्योगिक विकास, आर्थिक स्थैर्य, आणि सामाजिक उन्नती होणार असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केल. नामदार नितीन गडकरी हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या कार्यकाळात देशाने अनेक असाध्य वाटणारे प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या प्रकल्पांमुळे देश विकासाच्या दिशेने गतीशील पुढे जात आहे. देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने त्यांनी टाकलेले यशस्वी पाऊल भारताला सशक्त बनवणारे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली AID फोरम ची स्थापना करण्यात आली असून, ही संघटना विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीसाठी सतत कार्यरत आहे. 7 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गालगतच्या मैदानावर दुसरी अॅडव्हांटेज विदर्भ परिषद (2025) आयोजित केली जात आहे. या परिषदेत इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस कॉन्क्लेव्ह, आणि इन्व्हेस्टमेंट समिट यांचा समावेश आहे. विदर्भात गुंतवणूक आकर्षित करणे, या प्रदेशाचा औद्योगिक विकास वेगाने घडवणे, आणि नाविन्यपूर्ण व शाश्वत विकासाचे केंद्र म्हणून विदर्भाला प्रतिष्ठा मिळवून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. चंद्रपूरला या आयोजनातून मोठ्या अपेक्षा आहेत. पर्यटनदृष्ट्या चंद्रपूर जिल्ह्याचा विकास होत आहे. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. स्टील कंपनी, सिमेंट उद्योग, कोळसा खाणी या जिल्ह्यात आहेत. आता असेच दुसरे उद्योग येथे सुरू झाले पाहिजेत. लोहखनिजावर आधारित उद्योग येथे यावेत, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)