स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई, देशी दारूचे १५ बॉक्स जप्त करून ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, वाहनासह ५.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of local crime branch, 15 boxes of country liquor seized and case registered against 4 accused, goods worth Rs 5.52 lakh seized along with vehicle)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई, देशी दारूचे १५ बॉक्स जप्त करून ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, वाहनासह ५.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of local crime branch, 15 boxes of country liquor seized and case registered against 4 accused, goods worth Rs 5.52 lakh seized along with vehicle)


चंद्रपूर :- राजुरा - गडचांदूर मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिंद्रा बोलेरोची तपासणी करून त्यामधून देशी दारूचे १५ बॉक्स जप्त करून ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी पोलिसांनी दोघांना घटनास्थळावरून पकडले असून अन्य दोघे फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ही कारवाई ७ - ८ जानेवारी ला रात्री १.४० वाजता राजुरा शहरापासून 2 किमी अंतरावर केली. रात्री १.४० च्या सुमारास महिंद्रा बोलेरो क्रं एमएच ३३ ए ३७३१ येताना दिसली. वाहन जवळ येताच पोलिसांनी इशारा करून थांबवली. बोलेरो मध्ये नागेश विनायक माथनकर (३३) व रोहन नारायण रामटेके (२०) रा. आर्वी हे दोघे वाहनात सापडले. पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनी ही दारू राजुरा येथील रहिवासी स्वामी अण्णा यांच्या दारू भट्टीतील असून ही वाहन राजुरा येथील रहिवासी करण ओडोपल्ली यांची असल्याचे सांगितले. या आधारे पोलिसांनी स्वामी अण्णा, करण ओडोपल्ली, नागेश माथनकर, रोहन रामटेके यांच्याविरुद्ध राजुरा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ), ८३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. राजुरा येथून गडचांदूरकडे देशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचांदुर मार्गावर पाळत ठेवले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितेश महात्मे, पोहवा जयंत चुनारकर, पोहवा चेतन गज्जलवार, पोशी प्रफुल गारघाटे, अमोल सावे यांनी केले. याप्रकरणी राजुरा पोलीस स्टेशन चे हवालदार अनुप डांगे तपास करत आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)