भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता तात्काळ नोंदणी करा, अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Register immediately for last date to apply is 15th January)

Vidyanshnewslive
By -
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता तात्काळ नोंदणी करा, अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Register immediately for last date to apply is 15th January)


चंद्रपूर :- मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 10 वी, 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना, पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 26 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर योजना तालुका स्तरावरील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता देखिल सुरू करण्यात आली आहे. सन 2024-25 पासून नव्याने कार्यरत झालेले ऑनलाईन पोर्टल हे शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता एकत्रित तयार केले आहे. शासकीय वसतिगृहास ऑनलाईन अर्ज करणाऱ्या ज्या पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेअभावी शासकीय वसतिगृहास निवड झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वाधार योजनेकरिता ग्राह्य धरले जाऊन नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिन वर अग्रेषित केले जातील. पोर्टलवरील लॉगीन मध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती अपूर्ण भरल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहील, याची नोंद घेण्यात यावी. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, राशन कार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक (आधार लिंक असलेले), उत्पन्न दाखला (वडील हयात नसल्यास आईचे फोटो जोडणे व वडिलाचे मृत्यु प्रमाणपत्र जोडणे आवश्यक), 10 वी, 12 वी व मागील अभ्यासक्रमाच्या सर्व मार्क शीट, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी), बोनाफाईट सर्टिफिकेट (प्रोफेशनल कोर्स करिता कॅप राऊंड सर्टिंफिकेट सह) (Alotment Letter व्यावसाईक अभ्यासक्रम करिता), गॅप सर्टिफिकेट (शिक्षणामध्ये गॅप असल्यास आवश्यक), विद्यार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र, पालकाचे स्वयंघोषणापत्र, भाडेकरारनामा (लाईटबील सह), नगरपरिषद/ नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या महाविद्यालयाचे प्रमाणपत्र, महाविद्यालयाचे सहामाही 75 टक्के उपस्थिती, आवश्यक अभ्यासक्रम करिता व्हॅलेडिटी प्रमाणपत्र. अर्ज करण्याकरिता ऑनलाईन पोर्टल https://hmas.mahit.org, अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 जानेवारी 2025 आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)