बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात घरी गांजा विक्री करीता ठेवणाऱ्या एका युवकाला बल्लारपूर पोलिसांनी अटक करीत त्याच्या जवळून ४ किलो ७९ ग्राम गांजा सह ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई ७ जानेवारी रोजी केली. बल्लारपूर पोलीस स्टेशन चे महिला सहायक पोलीस निरीक्षक निलम बाबर ७ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की केजीएन चौक डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर येथे एक इसम आपल्या घरी अवैधरित्या विक्री करीता गांजा बाळगून आहे. सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गाडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिसांचे एक पथक तयार करून केजीएन चौक डॉ राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर येथे आरोपी रिजवान रमजान शेख वय ३९ वर्ष याचा घरी छापा टाकला. त्यात त्याच्या घराची झडती घेतली असता घराच्या मागील भागात एका चुंगडी मध्ये ४ किलो ७९ ग्राम गांजा जमिनीत पुरवून ठेवले होते. पोलीसांनी ते जप्त करून आरोपी रिजवान रमजान शेख याला ताब्यात घेतले. पोलीसांनी आरोपी रिजवान रमजान शेख याचा विरुध्द अमली पदार्थ अधिनियम १९८५ कलम ८(क), २० (ब), २० (ब)(ii) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील विठ्ठलराव गाडे यांचा नेतृत्वात महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम बाबर, पोलीस उपनिरीक्षक हुसैन शहा, परि. पोलीस उपनिरीक्षक सुनील धांडे, पोहवा. संतोष पंडित, पोहवा. संतोष दंडेवार, पो.अं.खंडेराव माने, पो.अं.प्रकाश मडावी, पो.अं.लखन चव्हाण, पो.अं.विकास जुमनाके, पो.अं.मिलिंद आत्राम, म.पो.अं.अनिता नायडू यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या