लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, बल्लारपूर पोलीस स्टेशन मधील उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अडकले 50 हजाराच्या लाचेच्या जाळ्यात (Anti-corruption department action, sub-inspector level officer in Ballarpur police station caught in bribery net of 50 thousand)

Vidyanshnewslive
By -
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, बल्लारपूर पोलीस स्टेशन मधील उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अडकले 50 हजाराच्या लाचेच्या जाळ्यात (Anti-corruption department action, sub-inspector level officer in Ballarpur police station caught in bribery net of 50 thousand)


बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक यांना 50 हजारांची Bribery लाचेच्या मागणीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. तेंदूपत्ता व्यापाऱ्याच्या कमिशन एजंट कडून 50 हजारांची लाचेची मागणी वरून सदर प्रकार घडला. सविस्तर वृत्त याप्रमाणे की, तक्रारदार चंद्रपूर येथील रहिवासी असून लाकूड, बांबू व तेंदुपत्ता इत्यादी वस्तू कमिशन नुसार ट्रकने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचवितात, दरम्यान ऑगस्ट महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील एका व्यापाराचा तेंडुपत्ता गडचिरोली जिल्ह्यातून बामणी येथे पोहोच केला याचे 19,02000 रुपये कमिशन झाले परंतु तक्रारदारास 3 - 4 महिने लोटूनही तेंदूपत्ता व्यापाऱ्याने कमिशन दिले नाही याला कंटाळून तक्रादारानी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान पोलीस उपनिरीक्षक यांनी मूळ रकम 1,90,2000 यावर वीस टक्के असे अंदाजे 3,80,000 रुपयांची मागणी केली. दिनांक 13 जानेवारी रोजी सापळा रचून तक्रारदार 50 हजार रुपये पंचांसमक्ष पोलीस उपनिरीक्षक यांचेकडे गेले असता त्यांना  संशय आल्याने ते घटनास्थळावरून पळून गेले यावरून पोलीस उपनिरीक्षक यांच्या विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला, आणि अटक करण्याची कारवाई करणार आहेत. 
         तक्रारदार आणि व्यापारी यांच्यात तडजोड झाली आणि व्यापाऱ्यानी तक्रारदार यांना 16,15,000 रुपये दिले यावरून प्रकरण आपआपसात मिटवले. तक्रारदारानी व्यापाऱ्या विरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांना कळवले यावरून पोलीस उपनिरीक्षक तक्रारदारास वारंवार फोन करून पैश्याची मागणी करीत होते, तसेच खोट्या गुन्ह्यात फसवण्याची भीती दाखवत होते. या मानसिक त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी दिनांक 8 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार नोंद केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शहा यांनी तडजोडीअंती 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. सदर कार्यवाही दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफो रमेश दुपारे, पो.हवा. हिवराज नेवारे, अरूण हटवार, नरेशकुमार नन्नावरे,, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप तोडाम, राकेश जांभुळकर, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर तसेच चापोशि संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)