बल्लारपूर पोलिसांची कारवाई, कोंबडा झुंजी वर जुगार खेळत असताना धाड टाकून ६ आरोपींना अटक करीत ४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of Ballarpur Police, 6 accused were raided while gambling on the cockfight, and valuables worth Rs 4,450 were seized.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची कारवाई, कोंबडा झुंजी वर जुगार खेळत असताना धाड टाकून ६ आरोपींना अटक करीत ४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of Ballarpur Police, 6 accused were raided while gambling on the cockfight, and valuables worth Rs 4,450 were seized.)


बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीसांनी कोंबडा झुंजी वर जुगार खेळत असताना धाड टाकून ६ आरोपींना अटक करीत ४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई ५ जानेवारी रोजी मोहाडी तुकुम जंगलात केली. बल्लारपूर पोलिसांचे पथक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देहात विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की मोहाडी तुकुम जंगलात कोंबड्याच्या झुंजीवर पैश्याची हारजीतची बाजू लावून जुगार खेळत आहे. त्यावरून छापा टाकून ६ आरोपींना अटक केले. त्यांच्या पासून ४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. पोलीसांनी आरोपी संकेत खुशाल ठाकरे (२४) रा. विठ्‌ठल मंदीर वार्ड चंद्रपूर, करण दिनेश नन्नवार (२४) रा विठ्ठल मंदीर वार्ड चद्रपूर, लाला दादाजी राउत (२५)  रा. काटोली ता. बल्लारपूर, श्रीकांत व्यंकटेश गुमलवर (२४)  रा काटोली ता. बल्लारपूर, अभिषेक नानदेव आत्राम  (२५) रा. काटोली ता.बल्लारपूर, योगेश शंकर पिपरे (३०) रा काटोली ता.बल्लारपूर यांच्यावर कलम १२ (ब) मजुका अन्वय गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंकज शिंदे, हवालदार २१० आगडे, पोशि १९१३ प्रकाश, पोशि ३५३ सचिन, पोशि १९४६ सौरभ यांनी केले.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)