बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर द्वारा महात्मा फुले महाविद्यालयात 45 वर्ष वरील खेळाडूंच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन (Ballarpur Sports Multi-Purpose Organization Ballarpur Organized Volleyball Tournament for Above 45 Years Players at Mahatma Phule College)
बल्लारपूर :- व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर द्वारा आयोजित 45 वर्ष वरील खेळाडूंच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक 19 जानेवारी 2025 ला करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रमोद आवते होते. अतिथींनी भाषणामध्ये 45 वर्षावरील खेळाडूंच्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेबद्दल अभिनंदन केले तसेच सुदृढ आयुष्यासाठी तसेच आरोग्यासाठी आणि अशा प्रकारचे सामने नियमित सुरू असावे असे म्हटले.
या स्पर्धेमध्ये एकूण 11 संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये हेल्थ ग्रुप राजुरा, मित्र मंडळ व्हॉलीबॉल सेनगाव, अंगद नगर व्हॉलीबॉल संघ राजुरा, फिनिक्स व्हॉलीबॉल गडचांदूर व जिल्हा स्टेडियम चंद्रपूर आणि चंद्रपूर वॉलीबॉल संघटना तुकुम या संघांनी सहगाग घेतला. बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेच्या तीन संघांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रथम पुरस्कार बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेच्या अ गटांनी प्राप्त केला व द्वितीय पुरस्कार जिल्हा स्टेडियम चंद्रपूर वॉलीबॉल संघाने प्राप्त केला. प्रमुख खेळाडूंमध्ये प्रमोद आवते, महेंद्र भोंगाडे, युवराज बोबडे, सुरेश गोडे ,प्रदीप खोडे, विजय कुळकर्णी, शांताराम वाडगुरे श्रीनिवास उन्नाव, परमेश्वर बोटला, सेंगर ,प्रज्वल ,शॉनल मंथन ,कार्तिक तसेच अन्य खेळाडूंनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आयोजकातर्फे पुढील महिन्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरुषांचे खुले पल व्हॉलीबॉल सामने दिनांक 19 फरवरीला ठरविले आहे. करिता जास्तीत जास्त संघांनी यामध्ये सहभाग द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या