राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सी वनमाथी यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारी तर विवेक जॉन्सन चंद्रपूर जिल्हा परिषदेत सीईओ पदी नियुक्ती (Transfers of senior IAS officers in the state, C Vanmathi appointed Wardhya Collector and Vivek Johnson as CEO in Chandrapur Zilla Parishad)
मुंबई :- राज्यात नवीन सरकार येताच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून त्याचाच भाग म्हणून या बदल्यांकडे पाहिलं जातंय.
1) मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली.
2) महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी.
3) गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा.
4) आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली.
5) वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली.
6) राज्य कर सहआयुक्त सी वनमाथी यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
7) सी वनमाथी यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी.
8) विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ.
9) पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली.
10) गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्ती
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या