बल्लारपूर : केंद्र शासन व राज्य शासनाच्या निर्देशानुसार बल्लारपूर तालुक्यामध्ये १९ ते २४ डिसेंबरदरम्यान 'गुड गव्हर्नन्स वीक २०२४ - प्रशासन गाव की ओर' या मोहिमेंतर्गत सुशासन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, कोठारी, कळमना व इतर ग्रामस्तरांवर सभांचे आयोजन करून तातडीने नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारी, समस्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यालयाकडून सर्व ऑनलाइन प्रलंबित दाखले, फेरफार, पुरवठा शाखा, संगायो शाखा, अभिलेखागार शाखा, तसेच इतर शाखांतील प्रलंबित अर्ज, प्रकरणे निकाली काढण्यात आले. या मोहिमेत तहसीलदार अभय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, अजय मल्लेलवार, सतीश साळवे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, पुरवठा निरीक्षक प्राजक्ता सोमलकर, मंडळ अधिकारी किशोर नवले, सुजित चौधरी, लिपिक दीपक वडुळे तसेच तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या