वन्यजीवाची शिकार करतांना बिबट सोलर कुंपणाच्या तारात अडकला, बल्लारशाह वनपरीक्षेत्र व अति शीघ्र दलाच्या माध्यमातून बिबट्याला जीवनदान (Leopard caught in solar fence wire while hunting wild life, Ballarshah Forest Park and Super Fast Rescue to rescue leopard)

Vidyanshnewslive
By -
0
वन्यजीवाची शिकार करतांना बिबट सोलर कुंपणाच्या तारात अडकला, बल्लारशाह वनपरीक्षेत्र व अति शीघ्र दलाच्या माध्यमातून बिबट्याला जीवनदान (Leopard caught in solar fence wire while hunting wild life, Ballarshah Forest Park and Super Fast Rescue to rescue leopard)


बल्लारपूर :- दिनांक 23 डिसेंबर 2024 ला बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कळमणा उपक्षेत्रामधील क्षेत्रीय कर्मचारी हे सकाळी 6.30 वाजताचे सुमारास बनात गस्ती वर असतांना त्यांना नियतक्षेत्र कळमणा मधील वनखंड क्रमांक 572 लगत असलेल्या शेतात रानडुक्कर ची शिकार करते दरम्यान बिबट (नर) शेतीच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या सोलर कुंपनाच्या तारात अडकुन असल्याबाबत मोक्यावर आढळुन आले असता अति शिघ्र दल, बल्हारशाह व डॉ. कुंदन पोडचलावार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र, ता.अ.व्या.प्र. चंद्रपुर यांनी सदर बिबट वन्यप्राण्यास बेशुध्द करुन रेसक्यु करण्यात आले व त्यानंतर वैद्यकीय तपासणी करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे पाठविण्यात आले. सदर रेसक्यु मोहिम मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे यांचे मार्गदर्शनात वनरक्षक श्री.एस.पी.नन्नावरे, श्री.सुधीर बोकडे, बायोलॉजीस्ट नुर अली सय्यद, अति शिघ्र दल, बल्हारशाह पथक व रोपवन संरक्षण मजुर यांनी सदर बिबट वन्यप्राण्याची तारेतुन सुटका करण्यास मोलाची भुमीका बजावली. (नरेश रा. भोवरे) वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)