बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अवैध दारूसह ५ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of Ballarpur Police, illegal liquor seized worth 5 lakh 19 thousand rupees)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची कारवाई, अवैध दारूसह ५ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of Ballarpur Police, illegal liquor seized worth 5 lakh 19 thousand rupees)
बल्लारपूर :- बल्लारपूर येथून बामणीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या अवैध दारूसह एकूण ५ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई २१ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता बल्लारपूर फॉरेस्ट गेटसमोर पोलिसांनी केली. बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक शनिवारी रात्री गस्तीवर निघाले होते. यावेळी बल्लारपूरहून बामणीच्या दिशेने पांढऱ्या रंगाच्या पिकअपमध्ये दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस पथकाने फॉरेस्ट गेटजवळ पांढऱ्या रंगाची पिकअप क्र. एमएच ३४ बीझेड ७१४३ थांबवून त्याची झडती घेतली. झडती घेतली असता पिकअपमधून १९ हजार १०० रुपयांची देशी दारू व बिअर जप्त करण्यात आली. पोलिसांनी प्रेम देविदास मेश्राम (२५), रा. शिवाजी वॉर्ड याच्याकडे दारूबाबत चौकशी केली. मात्र तो समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने पोलिसांनी ५ लाख रुपयांच्या पिकअपसह ५ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपी प्रेम मेश्राम विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक २१ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्रेतेवर कारवाई करत ३ महिला सहित ८ आरोपीवर गुन्हा दाखल केले. त्यात विसापुर येथे ३ तर शहरात ५ ठिकाणी कारवाई केली. त्यांच्यवर विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.आर. टोपले, उपनिरीक्षक हुसेन शहा, सफौ आनंद परचाके, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, रणविजय ठाकुर, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, पोलीस अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन  चव्हाण, खंडेराव माने, मिलिंद आत्राम, भूषण टोंगे, भास्कर चिचवलकर आदींनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)