चंद्रपूर :- जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गाैडा जी.सी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार, पोलीस उपाधीक्षक अँटीकरप्शन मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक गृह निशिकांत रामटेके, सा. बां विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, कृषी विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी सागर पोटदुखे, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरीश कालकर आदी उपस्थित होते. यावेळी, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या