बल्लारपूर शहरात तीन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहकार्याचे आवाहन (Water supply will be shut off in Ballarpur city for three days, Maharashtra Life Authority appeals for cooperation)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे बल्लारपूर शहरातील पाणी पुरवठा तीन दिवस होणार नाही आहे. या संदर्भात विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या वतीने जुनी नगर परिषद व बचत भवन समोर नवीन पाइप लाईन चे दुरुस्ती चे काम सुरू असल्यामुळे शहरात तीन दिवस २३ डिसेंबर पहाटे ६ वाजता पासून ते २६ डिसेंबर च्या पहाटे ६ वाजे पर्यंत पाणी पुरवठा होणार नाही आहे. विशेष म्हणजे २५ डिसेंबर ला ख्रिश्चन धर्मियांचा ख्रिसमसचा सण आहे. व त्याच दिवशी शहरात नळाला पाणी पुरवठा होणार नाही आहे. त्यामुळे त्यांच्या आनंद पर्वाला मुकावे लागणार आहे. या नवीन पाइप लाईन ची दुरुस्ती मजीप्राचे अधिकारी यांचा दिर्गाईने होत असून त्या पाइप लाईन मुळे मागील दोन हफ्त्या अगोदर त्या पाइप लाईन मधुन पाणी वाहल्यामुळे रविवार बाजारात चोहीकडे पाणी झाले होते. त्यामुळे भाजी विक्रेता चे आर्थिक नुकसान झाले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)