बल्लारपूर पोलिसांची कारवाई, दोन तलवारीसह एका आरोपीला अटक (Ballarpur police action, one accused arrested with two swords)
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीसांनी आज गुप्त माहिती चे आधारे एका आरोपीला दोन तलवार सहित अटक केले. आज १४ डिसेंबर ला बल्लारपूर पोलीस स्टेशन चे डी बी पथक चे अधिकारी व कर्मचारी शहरात अवैध धंद्यावर रेड करण्याकरिता तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरिता वस्ती विभागात गस्त करत असताना त्यांना गुप्त माहिती भगत सिंह वॉर्ड मध्ये कमल रामचंद्र वर्मा (२१) युवक लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देश्याने घरी तलवार लपवून ठेवले आहे. पोलीसांनी त्याचे घर गाठत घराची झडती घेतली असता दोन तलवार मिळून आले. पोलीसांनी आरोपी कमल रामचंद्र वर्मा याला अटक करून कलम २५, ४ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस टोपले, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा, सफौ आनंद परचाके, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, रणविजय ठाकुर, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, पोलीस अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, खंडेराव माने, मिलिंद आत्राम, भूषण टोंगे, भास्कर चिचवलकर, महिला पोलीस अनिता नायडू आदींनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या