चंद्रपूर :- भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यासाठी पुढील सहा दिवस तुकूम प्रभागात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काल पासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून सुमित्रा नगर येथील अमृत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन कार्यक्रमाने या सेवा सप्ताहाला सुरवात करण्यात आली आहे. १७ डिसेंबरला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम घेत साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आठवडाभर तुकूम परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात १३ तारखेला सुमित्रा नगर येथील अमृत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन, १४ डिसेंबरला शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, १५ डिसेंबरला योग शिबिर, १६ डिसेंबरला राष्ट्रवादी नगर येथील जगन्नाथ महाराज यांचा महाप्रसाद, १७ डिसेंबरला रक्तदान, रोगनिदान, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, लाडकी बहीण योजनेचा मेळावा, तर १८ डिसेंबरला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या