स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कत्तलीसाठी नेणाऱ्या ४५ गोवंशांची सुटका : १९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of local crime branch, release of 45 cattle being taken for slaughter: goods worth Rs. 19 lakh 18 thousand seized)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, कत्तलीसाठी नेणाऱ्या ४५ गोवंशांची सुटका : १९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of local crime branch, release of 45 cattle being taken for slaughter: goods worth Rs. 19 lakh 18 thousand seized)
चंद्रपूर :- कत्तली साठी नेणाऱ्या ४५ गोवंश ची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका करून ट्रक सह १९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. २३ डिसेंबर ला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर जिल्हा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना ट्रक क्रं सीजी २४ एस २६७२ मध्ये गोवंश जनावरे कत्तलीसाठी पडोली मार्गे घुग्गुस कडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घुग्गुस मार्गावरील धानोरा फाटा येथे नाकाबंदी करून ट्रक थांबवून तपासले असता ट्रक मध्ये ४५ नग गाई व बैल गोवंश जनावरे दाटीवाटीने वाहनात भरून गोवंश जनावराचे पाय बांधून कत्तली करिता वाहतूक करीत असतांना मिळून आले. सदर ४५ नग गोवंश जनावरांना प्यार फाउंडेशन गोशाळा दाताळा, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. ४५ नग गोवंश जनावरे व जुना वापरता ट्रक क्रं सीजी २४ एस २६७२ असा एकुण १९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  करुन दोन आरोपींना पो.स्टे. घुग्गुस यांचे ताब्यात दिले. पोस्टे घुग्गुस येथे अप क्रं ४४२/२०२४ कलम ११(१) (घ),(ड),(च), (ज ) महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम  सह कलम ५(अ),९,११ प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात परिविक्षाधीन अधिकारी एसडीपीओ चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोहवा नितेश महात्मे, जयंता चूनारकर, चेतन गज्जलवार, पो.अं. किशोर वकाटे, अमोल सावे, चापोहवा दिनेश अराडे यांनी केले. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)