बल्लारपूर पोलिसांची कारवाई, वर्धा नदीच्या काठावर कोंबडा बाजार वर धाड : १३ आरोपीसह ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of Ballarpur Police, Raid on Kombra Bazar on the banks of Wardha River: 13 Accused along with Rs 6 lakh 16 thousand seized)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची कारवाई, वर्धा नदीच्या काठावर कोंबडा बाजार वर धाड : १३ आरोपीसह ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Action of Ballarpur Police, Raid on Kombra Bazar on the banks of Wardha River: 13 Accused along with Rs 6 lakh 16 thousand seized)


बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीसांनी आज आमडी शेत शिवारात वर्धा नदीच्या काठावर सुरू असलेल्या कोंबडा बाजार धाड टाकत १३ आरोपींना अटक करत ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. आज ३१ डिसेंबर २०२४ वर्षांच्या आखरी दिवसी बल्लारपूर पोलीस चे गुन्हे शोध पथक बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली नुसार आमडी शेत शिवारात वर्धा नदीच्या काठावर कोंबडा बाजार मध्ये पैसे लावून हार जित सुरू आहे. त्यानुसार बल्लारपूर पोलीस चे गुन्हे शोध पथक चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सापळा रचत कोंबडा बाजार वर धाड मारली. त्यात १३ आरोपी सह १३ मोबाईल, ९ दुचाकी व 3 नग कोंबडा सह नगद ६ हजार १०० रुपये असे एकूण ६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. आरोपी विरुध्द कलम १२ (ब) महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. टोपले, उपनिरीक्षक हुसेन शहा, सफौ आनंद परचाके, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, रणविजय ठाकुर, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, पोलीस अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम शेखर माथनकर, लखन चव्हाण, खंडेराव माने, भूषण टोंगे, भास्कर चिचवलकर, मपोशी अनिता नायडू आदींनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)