स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मूल येथील हत्या प्रकरणात 3 आरोपीना अवघ्या 24 तासात अटक (Action of local crime branch, 3 accused arrested in just 24 hours in Mul murder case)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मूल येथील हत्या प्रकरणात 3 आरोपीना अवघ्या 24 तासात अटक (Action of local crime branch, 3 accused arrested in just 24 hours in Mul murder case)


मूल :- किरकोळ वादातून झालेल्या हत्याच्या मुख्य मुख्य आरोपी व त्याचे साथीदारांना २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने ३ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यात एका विधीसंघर्षित बालक चा समावेश आहे. काल रात्री १०.३० मुल येथे पंचायत समिती समोरील महामार्गावर ऋतिक अनिल शेंडे (२८) रा. विहीरगाव हा नगर परिषदने बनवलेल्या बस स्टॅन्ड च्या बाजूला दुचाकी ठेऊन मोबाईल वर बोलत असतांना ३ जण येऊन ऋतिक वर चाकूने छातीवर आणि कमरेवर सपासप वार करून रक्त बंबाळ केले. तो खाली कोसळला. मारेकरी यावरच थांबले नाही तर रस्त्यांनी जात असलेल्या लोकांना सुद्धा चाकूच्या धाक देऊन धमकावत होते.काही वेळाने घटनास्थळवरून मारेकरी पसार झाले. लोकांनी ऋतिक शेंडे याला उपजिल्हा रुग्णालय मुल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले  वरून पोलीस स्टेशन मुल येथे अप. क्रं ५१२/२०२४ कलम १०३(१), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दाखल केले होते. हत्येचा गुन्हयातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे विविध पथके तयार करून काल, २७ डिसेंबर गुन्हा घडलेपासुन अथक प्रयत्नाने सातत्याने आरोपींचा शोध चंद्रपूर व लगतच्या जिल्हयात घेत असतांना नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी  राहुल सत्तन पासवान (२०) रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं. १५. मुल, ता. मुल. जि. चंद्रपूर, त्याचा साथीदार आरोपी अजय दिलीप गोटेफोडे (२२), रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५. मुल, ता. मुल.जि. चंद्रपूर व विधीसंघर्षित बालक यास २८ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतुन ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास दिनकर ठोसरे उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मुल करीत आहेत. सदरची कारवाई सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)