धक्कादायक! मूल शहरात किरकोळ वादातुन 24 वर्षीय युवकांची निर्घृण हत्या (Shocking! Brutal killing of 24-year-old youth due to petty dispute in Mul city)
मूल :- किरकोळ वादातून जिल्ह्यातील मुल येथे युवकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केली. मुल शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामागे अवैध धंदे असल्याचे बोलले जात आहे. मारेकरी गांजाच्या व्यवसायात गुंतल्याचे बोलले जात आहे. ऋतिक ला थांबवून वाद केला व यातून विरोध केला असता त्याच्यावर ठिकठिकाणी चाकूने वार करण्यात आले. काल रात्री १०.३० च्या सुमारास ऋतिक शेंडे वय २४ वर्ष याची चाकूने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आले होते. ऋतिक शेंडे मुल येथील विहीरगाव परिसरात राहत असून पंचायत समिती समोरील महामार्गावर चार - पाच युवकांनी त्याच्यावर चाकूने वार केले. त्याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. अधिक तपास मुल पोलीस करत असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुद्धा आरोपीचा मागावर आहेत. घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी घटनास्थळला भेट दिली असून अधिक तपास सुरु आहे दरम्यान काल झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज मूल शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या