मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही - ठिकठिकाणी नाकाबंदी (Strict penal action will be taken against drunk drivers - blockade at places)

Vidyanshnewslive
By -
0
मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही - ठिकठिकाणी नाकाबंदी (Strict penal action will be taken against drunk drivers - blockade at places)


चंद्रपूर :- दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने सदर उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरूणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश ड्रायव्हिग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडुन जिवितहानी होत असते. त्यांच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक २९ डिसेंबर पासुन ते दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे. नागरिकांनी मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सिट, रॅश ड्रॉयव्हींग, स्टंटबाजी करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाविरुध्द विशेष मोहीम घेवुन कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नववर्षाचे स्वागत करतांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी. याबाबत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्हा पोलीस विभागातर्फे आवाहन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)