बल्लारपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिग यांना वाहिली श्रद्धांजली (On behalf of Ballarpur Congress Committee, Tribute to former Prime Minister Dr. Manmohan Sing)
बल्लारपूर :- पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल बल्लारपूर काँग्रेस कमिटीने वाहिली श्रद्धांजली भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल 26 डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल बल्लारपूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज त्यांच्या कार्यालयात काँग्रेसचे पदाधिकारी घनश्याम मूलचंदानी, नगराध्यक्ष दिलीप माकोडे, माजी गटनेते देवेंद्र आर्य, रेल्वे सल्लागार समिती सदस्य नरेश मुंदळा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी नगरसेवक इस्माईल ढाकवाला तालुकाध्यक्ष गोविंदा उपरे, प्रणेश आमराज, दौलत बुंदेल, शरद एकटे, नाना बुंदेल, कासीम भाई, बाबूभाई, नरेश गुंडापेल्ली, सुरेश बोपनवार, राजू मरमवार आदी उपस्थित होते. नरेश मुंदळा यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या