महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा (A review of law and order by the District Collector in the background of the Maharashtra Assembly General Election)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा (A review of law and order by the District Collector in the background of the Maharashtra Assembly General Election)


चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – 2024 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जीएसटीचे सहायक आयुक्त मोहन खोब्रागडे, आयकर अधिकारी सुरेश चौधरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुक्त आणि पारदर्शक वातावरणात सदर निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अतिशय चोख असणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयकर विभाग, केंद्रीय व राज्य जीएसटी विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रेल्वे पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस विभाग, वन विभाग व इतर यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेच्या नोडल अधिका-यांशी नियमित संपर्क ठेवावा तसेच समन्वयातून काम करावे. अवैध रक्कम, दारूचा पुरवठा, संशयित बाबी, ड्रग्ज आदी बाबींच्या जप्तीबाबत निवडणूक आयोगाच्या अतिशय सक्त सुचना आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजाणी करावी. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असल्यामुळे इकडून तिकडे पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी दक्ष असावे. आपापल्या सुत्रांच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळविण्यावर भर द्यावा व योग्य कारवाई करावी. जिल्ह्याच्या सीमेलगतच्या चेक पोस्टवर त्वरीत अधिकारी - कर्मचा-यांची नियुक्ती करावी. तपासणी दरम्यान एखादे वाहन पकडले तर त्याचा पुर्वइतिहास तपासावा. जिल्ह्यात येणारे पार्सल तसेच बस आणि ट्रॅव्हल्समधून होणारी पार्सल वाहतूकीची तपासणी करावी. विविध विभागांनी करावयाची कारवाई निवडणूक प्रक्रियेदरम्यान संशयीत बाबींची जप्ती प्रकरणे वाढविणे आवश्यक आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहिती गोळा करावी. अवैध व बनावट दारुवर गांभिर्याने लक्ष ठेवावे. गुटखा, ड्रग्ज प्रतिबंधित वस्तुंची तपासणी करावी. जिल्ह्यात अचानक एखाद्या वस्तुची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्यास जीएसटी विभागाने सदर बाब प्रशासनाला कळवावी. आयकर विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाने नागपूर, हैद्राबाद, छत्तीसगड मधून येणा-या ट्रॅव्हल्स चेक कराव्यात. सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अचानक मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होत असेल तर निवडणूक खर्च पथकाला माहिती द्यावी. पैसे ट्रान्सफर करतांना संबंधितांची कागदपत्रे अधिकृत असल्याची खात्री करावी.उपविभागीय पोलिस अधिका-यांसाठी विशेष सुचना : मतदान यंत्र व स्ट्राँग रुमच्या सुरक्षाकवचाला सर्वोच्च प्राधान्य असावे. पोलिसांनी आवश्यक सुरक्षाव्यवस्था पुरवावी. यात कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नये. नामांकन प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात केवळ 3 वाहनांना परवानगी द्यावी तसेच उमेदवारांसह एकूण पाच व्यक्तिंनाच आतमध्ये प्रवेश द्यावा. स्ट्राँग रुमला दिवसातून दोन वेळा नियमित भेट देऊन पाहणी करावी. प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही चेक करावे. मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिस अधिका-यांना सर्व सुचनांबाबत अवगत करावे व प्रशिक्षण द्यावे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)