बल्लारपूर येथील भिवकुंड हनुमानजी च्या मूर्तीची विटंबना, हनुमान भक्त आंदोलनाच्या पावित्र्यात, पोलीस तपास सुरु (Desecration of idol of Bhivkund Hanumanji in Ballarpur, in sanctity of Hanuman devotee movement, police investigation started)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर येथील भिवकुंड हनुमानजी च्या मूर्तीची विटंबना, हनुमान भक्त आंदोलनाच्या पावित्र्यात, पोलीस तपास सुरु (Desecration of idol of Bhivkund Hanumanji in Ballarpur, in sanctity of Hanuman devotee movement, police investigation started)


बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील भिवकुंड नाल्याजवळील परिसरात असलेल्या भिवकुंड हनुमान मंदिराच्या मूर्तीची तोडफोड झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण हनुमान भक्त संतप्त होत असून, आंदोलन, चक्का जाम आंदोलनाच्या भूमिकेत दिसत आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे, विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीही याच मंदिरातील हनुमानजी च्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. त्यावेळही त्याविरोधात हजारो हनुमान भक्त, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. पोलिसांनी तडकाफडकी एका आरोपीला अटक करण्यात आले होते मात्र तो मानसिक रोगी असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. 

 
          सध्यास्थितीत पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी भेट दिली असून लवकरच या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात येईल पोलीस विभागाच्या चमू विविध दिशेने तपास करीत आहे व या मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या यावेळी दिपक साखरे, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार वैभव गायकवाड यांनी सुद्धा भेट देत पाहणी केली आहे. सध्या हनुमान भक्तांमध्ये रोष व्यक्त होत हनुमान भक्त आनंद तिवारी, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष कैलाश जोरा, शुभम निषाद, विकी माजरे, सचिन मुडे, श्रीकांत उपाध्याय, ऋषभ पेंदोर, अंकुश वर्मा, प्रदीप गेडाम, अंकुश नरलवार, हुकुम वर्मा, उमेश कुंडले तसेच विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आदींसह शेकडो श्री रामभक्तांचा समावेश आहे. घटनास्थळी दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)