बल्लारशाह येथील रेल्वे आरपीएफ मध्ये कार्यरत पवन यादवने कुस्ती स्पर्धेत शेर- ए- दंगलचा किताब पटकावला (Pawan Yadav working in Railway RPF at Ballarshah won the Sher-e-Dangal title in a wrestling competition)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारशाह येथील रेल्वे आरपीएफ मध्ये कार्यरत पवन यादवने कुस्ती स्पर्धेत शेर- ए- दंगलचा किताब पटकावला (Pawan Yadav working in Railway RPF at Ballarshah won the Sher-e-Dangal title in a wrestling competition)
बल्लारपूर :- रेल्वेत आरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या पवन यादव या कुस्तीपटूने मध्य प्रदेश येथील छिंदवाड़ा जिल्ह्यातील छिदा येथे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत शेर- ए- दंगलचा किताब पटकावला. पवन यादव हे बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आरपीएफमध्ये कार्यरत आहे. त्यांना कुस्तीची आवड आहे. आपले काम प्रामाणिकपणे करून ते कुस्ती खेळतात. त्यांनी दंगलमध्ये परासिया, जटाछापर, दरबाई, भाजीपाणी, छिंदा, सेठिया अशा सर्वत्र विजेतेपद पटकावले आहेत. यावेळी तो पुन्हा छिंदा सेठिया दंगलमध्ये सामील झाले आणि तीन कुश्ती जीवन शेर- ए- दंगलचा किताब पटकावला. पवन यादव कुस्तीपटूने राजस्थान, इंदोर आणि शकरवाडा येथील कुस्तीपटूंचा पराभव केला. छिदा सेठिया दंगलमध्ये त्याने पहिल्या कुस्ती लढतीत इंदोरच्या एका कुस्तीपटूला, दुसऱ्या कुस्ती सामन्यात राजस्थानच्या कुस्तीपटूला आणि तिसऱ्या कुस्तीच्या सामन्यात शकरवाड्याच्या एका पैलवानाचा पराभव करून शेर- ए- दंगल पुरस्कार जिंकला. क्रेडिट सोसायटी चांदामेटा चे अध्यक्ष मार्कंडेय सूर्यवंशी यांनी त्यांना शिल्ड आणि पुरस्कार प्रदान केले त्यांच्या या कार्याची रेल्वे आरपीएफ चे निरीक्षक सुनील कुमार पाठक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)