बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर मध्ये आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 ला दांडिया स्पर्धा आंतरवर्गीय चे आयोजन समाजशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. एकल नृत्य व समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळेस मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.सतीश कर्णासे प्रमुख पाहुणे म्हणून सौ .तेजस्विनी येगीनवार , समाजशास्त्र विभाग प्रमुख सौ शुभांगी भेंडे शर्मा तसेच प्रा.सोनाली कायरकर ,प्रा.पल्लवी जुनघरे , प्रा. स्वाती होते.
प्रास्ताविक भाषणात समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी नवरात्रीचे महत्त्व आणि सर्व विद्यार्थ्यांना गरबा नृत्याचा मंच प्राप्त व्हावा व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी समाजशास्त्र विभागातर्फे गरबा नृत्याचे आयोजन केले जाते असे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच अध्यक्षीय भाषणात प्रा.सतीश कर्णसे, यांनी नवरात्रीचे महत्त्व पटवून देताना अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सण उत्सवाची महत्त्व कळावे व त्यासाठी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा या नेहमी प्रयत्नरत असतात त्यासाठी त्यांचे कौतुक केले. बक्षीस वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी .डी चव्हाण तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले . या समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार गायत्री ग्रुपला मिळाला यामध्ये गायत्री पद्मिनी, लक्ष्मी पांडे, कल्याणी राऊत, गुणगुण बनिया, सानिया शेख, सिमरन गवई यांचा समावेश होता द्वितीय पुरस्कार अंजली आणि अश्मिरा शेख यांना मिळाला. प्रोत्साहनपर पारितोषकाचे मानकरी चाहत बहुरिया, सोनाली मजुमदार, मितिका आत्राम, गुणगुण टेकाळे, गायत्री बावणे, सानिया बावणे, कल्पना कचरे प्रतीक्षा कोठारे, अनुष्का थाल आणि रिया ठरले. एकल नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राची बहुरिया द्वितीय पारितोषिक सानिया सय्यद तृतीय पारितोषिकाची मानकरी गायत्री पद्मिनी ठरली .त्यानंतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळेस सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहयोगाने अशाप्रकारे हा सोहळा संपन्न झाला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या