महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी (Mahatma Jyotiba Phule College celebrated the birth anniversary of Father of the Nation Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri with enthusiasm)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी (Mahatma Jyotiba Phule College celebrated the birth anniversary of Father of the Nation Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri with enthusiasm)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच एनसीसी विभागाद्वारे ले. प्रा. योगेश टेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
 
       यानंतर रासेयो विभागाद्वारे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. डॉ. पल्लवी जुनघरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. विनय कवाडे (सहकार्यक्रम अधिकारी) ई ची उपस्थिती होती यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमाना अभिवादन करण्यात आले.

 
             या निमित्ताने प्रा. दिवाकर मोहितकर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, " देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजीच अतुल्य योगदान असून गांधीजी एक व्यक्तिमत्व नसून विचारधारा आहे त्यांचे विचार अजरामर असून ते विचार प्रत्यक्षपने कृतीत उतरविण्याची गरज आहे. गांधीजीची सत्य व अहिंसाची तत्व ही अवघ्या जगाने स्विकारली असून त्यांचा खेड्याकडे चला हा संदेश ग्रामीण विकासाचा पाया ठरला आहे तसेच जय जवान जय किसान हा नारा देणारे देशाचे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री याचे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. " असे मत व्यक्त केले. 

 
           यावेळी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)