धक्कादायक ! कोरपणा येथील नामांकित शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला केली अटक (Shocking! A teacher of a reputed school in Korpana molested a minor girl, the local crime branch arrested the accused)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! कोरपणा येथील नामांकित शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला केली अटक (Shocking! A teacher of a reputed school in Korpana molested a minor girl, the local crime branch arrested the accused)

चंद्रपूर :- बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतांना चंद्रपूर येथे देखील अशीच घटना उघडकीस आली आहे, येथील एका बड्या शाळेत ११ वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यावर कोरपना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. आरोपी हा राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोरपना येथील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून तो एका खासगी शाळेत शिक्षक आहे. आरोपी हा उन्हाळ्यात शाळेत अतिरिक्त वर्ग घेत होता. या साठी तो मुलांना शाळेत बोलवत होता. याच क्लासमध्ये त्याने मुलीला बोलवत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, भीतीपोटी मुलीने ही घटना कुणालाही सांगितली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शाळेत क्लासेस करता आली होती. यावेळी अमोल लोंढे या आरोपी शिक्षकाने मुलीला ऑफिसमध्ये चल म्हटले. यानंतर त्याने ऑफिसमध्ये कुणी नसल्याची संधी साधत पीडित मुलीला धमकावत दोन गोळ्या खान्यासाठी दिल्या. यानंतर पीडित मुलीवर त्याने कार्यालयात बलात्कार केला. यानंतर तिला धमकावले तसेच तिला आणि तिच्या घरच्यांना जीव मारण्याची धमकी आरोपीने दिली. मात्र, मुलीला त्रास होत असल्याने या घटनेची कुणकुण घरच्यांना मिळाली. या नंतर मुलीला पालकांनी विश्वासात घेऊन तिला या प्रकरणी माहिती विचारली. यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन थेट पोलिस ठाणे गाठत त्या शिक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असून अमोल लोडेवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा अकोला मार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनिय माहिती विश्वसनीय सूत्रानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच अकोला येथे एक पथक रवाना होवून मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी अमोल विनायक लोडे, वय 28 वर्ष, रा. कोरपना, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपुर यांस रात्री दरम्यान अकोला येथील बस स्थानकातुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन कोरपना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुरं यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोहवा. धनराज करकाडे, नितेश महात्मे, जयंत चुनारकर, दिनेश आराडे, पोशि. मिलींद टेकाम स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)