गोंडवाना विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वॉलीबॉल स्पर्धा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात संपन्न (Gondwana University Inter College Volleyball Tournament concluded at Mahatma Jyotiba Phule College)

Vidyanshnewslive
By -
0
गोंडवाना विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वॉलीबॉल स्पर्धा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात संपन्न (Gondwana University Inter College Volleyball Tournament concluded at Mahatma Jyotiba Phule College)


बल्लारपूर :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर व गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15, 16 व 17 ऑक्टोबर 2024 ला आंतर महाविद्यालयीन वॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मुलांची आणि मुलींची ठरवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 48 संघांनी सहभाग घेतला. मुलांच्या स्पर्धेमध्ये भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली विजयी झाले तर उपविजेता सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर झाली. तर तृतीय पुरस्कार राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर यांनी पटकावला. मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार एएनसी महाविद्यालयय वरोरा प्राप्त केला. द्वितीय पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर आणि तृतीय पुरस्कार एफ. ई. एस. महाविद्यालय चंद्रपुर यांनी प्राप्त केला.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बहिरवार उपस्थित होते. त्याचप्रमाणे बल्लारपूर स्पोर्ट्स अँड बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष प्रमोद आवते आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंचांची भूमिका प्रज्वल आवते आणि शॉनल कायरकर या बल्लारपूर स्पोर्ट्स आणि बहुउद्देशीय संस्था चे सदस्यांनी पार पाडली. व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन योग्यरीता पार पाडल्याबद्दल गुरुनानक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. शर्मा आणि महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ बालमुकुंद कायरकर यांनी उत्कृष्ट पार पाडली. त्याचप्रमाणे आयोजनाकरिता बल्लारपूर स्पोर्ट्स अँड बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रा.भोंगाडे, शांताराम वाडगुरे, श्रीनिवास उणीवा, प्रा. युवराज बोबडे, मंथन सक्रिय सहभाग दिला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)