बल्लारपूर - उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपुर पोलीसांना आज दिनांक - २२/०९/२०२४ चे पोलीस ठाणे बल्लारपुर येथे फिर्यादी नामे अजय रामसागर बेन्नी वय-३७ वर्षे रा. कादरीया मस्जिद चौक बल्लारपुर जि. चंद्रपुर याने पोलीस ठाणे बल्लारपुर येथे येवुन मोटार सायकल चोरीची तक्रार दिल्यावरुन पोलीस ठाणे बल्लारपुर गुन्हा रजि. क्रं. ९०९/२०२४ कलम-३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयातील मोटार सायकल चोरी व आरोपीचा शोध घेणे कामी दिनांक ०४/१०/२०२४ रोजी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे माहिती मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारा आरोपी संशयीत रित्या वस्ती परिसरात फिरत आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन एक इसम संशयीतरित्या फिरत असतांना मिळुन आल्याने. त्यास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रिन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया वय-२० वर्षे रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपुर जि. चंद्रपुर असे सांगितले वरुन त्यास मोटार सायकल चोरी बाबत विचारपुस केली असता. त्याने मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवुन ०२ मोटार सायकल काढुण दिल्या त्यास अधिक विचारपुस केली असता. त्याने सांगितले की, मी माझा मित्र- सुरेश ऊर्फ सुर्या कैलाश हरणे वय-२० वर्षे रा. श्रिराम वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांचेसह मिळुन मौजा बामणी व आंबेडकर वार्ड बल्लारपुर परिसरातुन मोटार सायकल चोरी केली आहे. त्या मोटार सायकल मी माझा मित्र नामे- पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद वय-३० वर्षे रा. रामनगर सास्ती झेंडा वस्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर याला विक्री केल्याचे सांगितले व त्याचेकडे घेवुन गेला असता त्यास आरोपी क्रं.१) ने मोटार सायकल दिल्याबाबत विचारपुस केली असता. त्याने मोटार सायकल घेतल्याचे सांगितले व घरासमोर उभ्या असलेल्या ०३ मोटार सायकल काढण दिल्या. त्यानंतर आरोपी क्रं.१) अधिक विचारपुस केली असता. त्याने आणखी मोटार सायकल मी व माझा मित्र सुर्या हरणे, लवकुश ऊर्फ लडु निशाद असे मिळुन पोलीस ठाणे राजुरा व पोलीस ठाणे चंद्रपुर शहर तसेच पोलीस ठाणे बल्लारपुर येथुन चोरी केलेल्या मोटार सायकल भगतसिंग वार्ड येथिल आरोपी नामे ४) तौकीर तौहिद शेख वय-२७ वर्षे व्यवसाय मोटार सायकल गॅरेज रा. भगतसिंग वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यास दिल्याचे सांगुन त्याचेकडे घेवुन गेला. त्यावेळी त्याचेकडे मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले तेव्हा त्याचे मोटार सायकल गॅरेजची पाहणी केली असता पुर्ण मोटार सायकलचे स्पेअर स्पॉर्ट खोलुन दिसले. त्यातील ०३ मोटार सायकल इंजिन ची पाहणी करुन त्याबाबत विचारपुस केली असता त्याने चोरीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास आणखी विचारपुस केली असता त्यांने काही इंजिन भंगार दुकानदार नामे जावेद यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्यास भंगार दुकान येथे आणुन भंगार दुकानाची पाहणी केली असता भंगार दुकानात ०४ मोटार सायकल इंजिन संशयीतरित्या मिळुन आल्या. याबाबत भंगार दुकानदार जावेद यास विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे असमाधानकारक उत्तर दिल्याने सदर मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याची शहानिशा करुन पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.
सदर मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे- १) आरोपी नामे प्रिंन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया रा. सरदार पटेल वार्ड बल्लारपुर याचे ताब्यातुन जप्त केलेल्या मोटार सायकल-
१) कि.अं.२०,०००/- एक काळया रंगाची हिरो कंपनीची फॅशन प्लॅस मोटार सायकल क्र.एम.एच.३४ झेड ११४० कि.अं.
२) कि.अं.३०,०००/- एक काळया रंगाची बजाज प्लसर मोटार सायकल क्र.एम.एच.३४ ए.एस.५२३७. १) आरोपी नामे पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद रा. रामनगर सा
स्ती ता. राजुरा याचे ताब्यातून जप्त केलेल्या मोटार सायकल - १) कि.अं.१५,०००/- एक काळया रंगाची हिरो कंपनीची स्लेंडर मोटार सायकल क्र.एम.एच.३४ बी.जे.५९३७ कि.अं.
२) कि.अं. १०,०००/- एक काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रं.एम.एच.३४ झेड.३१२८ कि.अं.
३) कि.अं. १५,०००/- एक काळया रंगाची हिरो होंन्डा कंपनीची स्प्लेंडर प्लॅस मोटार सायकल क्रं.एम.एच.३४ ऐ.जे.५७५१ कि.अं.
१) आरोपी नामे तौकीर तौहीद शेख यय-२७ वर्षे रा. भगतसिंग वार्ड बल्लारपुर याचे ताब्यातुन जप्त केलेल्या मोटार सायकल- १) याचेकडुन मोटार सायकलचे सुटे भाग एकुण-०३ इंजीन जप्त करण्यात आले असुन त्यामधील ०२ इंजिन पोलीस ठाणे बल्लारपुर येथील गुन्हयातील आहेत व ०१- पोलीस ठाणे राजुरा येथील आहे. २) भंगार दुकानदार नामे जावेद वय वर्षे रा. गणपती वार्ड बल्लारपुर याचे ताब्यातुन जप्त केलेल्या मोटार सायकल- १) याचेकडुन मोटार सायकलचे बजाज कंपनीचे सुटे भाग एकुण-०४ इंजीन जप्त करण्यात आले असुन त्याची शहानिशा करणे सुरु आहे. असा कि.अं.९०,०००/-रु. मोटार सायकल व सुटे स्पॉर्ट व इंजिन असा एकुण-१,५०,०००/-रु मिळुन आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि.सुनिल वि.गाडे, सपोनि. अंबादास टोपले, पोउपनि. हुसेन शहा, सफौ. गजानन डोईफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. सत्यवान कोटनाके, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे. या बाबतीतला पुढील तपास सुरु आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या