दुर्गा देवी विसर्जण दरम्यान चाकुनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी ताब्यात घेतले (The accused who committed the knife attack during the Durga Devi immersion were arrested by the Local Crime Branch, Chandrapur.)

Vidyanshnewslive
By -
0
दुर्गा देवी विसर्जण दरम्यान चाकुनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी ताब्यात घेतले (The accused who committed the knife attack during the Durga Devi immersion were arrested by the Local Crime Branch, Chandrapur.)

चंद्रपूर :- दिनांक १७/१०/२०२४ रोजी फिर्यादी नामे यश कुशाल करारे, वय १९ वर्ष, रा. सपना टाकीज मागे, जलनगर वार्ड, चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन, रामनगर येथे तक्रार दिली की, दिनांक १७/१०/२०२४ रोजी राजौ ९/३० वाजता दरम्यान फिर्यादी व त्याचे मिञ असे अक्टीव्हा मोपेड गाडी नी देवी विसर्जन मिरवणुक पाहण्याकरीता रामनगर चौक येथे जावुन सेलिब्रेशन हॉटेल समोर मोपेड गाडी ठेवुन मिरवणुक पाहुन गाडी ठेवलेल्या ठिकाणी गेला असता, नामे. संगम सागोरे व त्याचे साथीदार हे " तु साले जलनगर वार्ड में भाई गिरी करतो" असे म्हणुन मारहाण करुन नामे पियुश पोवाम हा त्याचे हातामधील काचाचे बॉटलनी फिर्यादीस मारली तसेच संगम सागोरे यांनी त्याचे जवळील चाकुने जिवे मारण्याचे उद्देशाने पाठीवर तसेच मानेवर वार केले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप. क्र. ९६०/२०२४ कलम १०९, २९६, ३(५),३५१ (२), ३५१ (३) भा. न्या. स. प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला. नमुदंचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे आदेशान्वये नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे कामी पोउपनि विनोद भुरले व पोलीस स्टॉफ असे रवाना होवुन गोपनिय बातमिदाराचे माहिती तसेच तांत्रिक दष्टा कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपी नामे १) विनीत नानाजी तावाडे, वय २३ वर्ष, धंदा मजुरी, रा. बापट नगर, ओम भवन जवळ, चंद्रपुर, २) संगम संभाजी सागोरे, वय २८ वर्ष, धंदा मजुरू, रा. मित्रनगर, आंबेडकर कॉलेज जवळ, चंद्रपुर, तसेच तिन विधी बालक यांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन, रामनगर यांचेकडे पुढील तपासाकरीता ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कॉडावार यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोहवा/किशोर वैरागडे, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठठावार, नापोअं. / संतोष येलपुलवार, पोशि. गोपीनाथ नरोटे, पोशि/गोपाल आतकुलवार, स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)