भाजपची दुसरी यादी जाहीर, वरोरा येथून करण देवतळे, राजुरा देवराव भोंगळे उमेदवार, चंद्रपूरातून किशोरभाऊ जोरगेवार यांनी उमेदवारी मिळणार? (BJP's second list announced, Karan Devtale, Rajura Devrao Bhongle candidate from Warora, Kishorebhau Jorgewar from Chandrapur will get candidature?)

Vidyanshnewslive
By -
0
भाजपची दुसरी यादी जाहीर, वरोरा येथून करण देवतळे, राजुरा देवराव भोंगळे उमेदवार, चंद्रपूरातून किशोरभाऊ जोरगेवार यांनी उमेदवारी मिळणार? (BJP's second list announced, Karan Devtale, Rajura Devrao Bhongle candidate from Warora, Kishorebhau Jorgewar from Chandrapur will get candidature?)


चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा ज्वर जसाजसा वाढतोय तशी राजकीय नेत्यांची लगबग वाढल्याचे दिसते अनेक राजकीय पक्ष आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रीय पक्षापैकी काँग्रेसने चिमूर, ब्रम्हपुरी व राजुरा येथील उमेदवार जाहीर केले आहे ब्रह्मपुरी येथून विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, चिमूर मधून सतीश वाजूरकर, राजुरा येथून सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडी वरोरा, चंद्रपूर व बल्लारपूर येथील उमेदवार लवकरच जाहीर करतील. दुसरीकडे महायुतीने आज जाहीर केलेल्या 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील चंद्रपूर वगळता 5 मतदार संघातील उमेदवार जाहीर झाले असून राजुरा येथून देवराव भोंगळे, ब्रम्हपुरी येथून बाजीराव सहारे, चिमूर येथून बंटी भांगडिया, वरोरा येथून करण संजय देवतळे, बल्लारपूर येथून राज्याचे नेते सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना जाहीर झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहिती नुसार चंद्रपूर या अनुसूचित जाती राखीव असलेल्या मतदार संघातून अपक्ष आमदार असलेले किशोर भाऊ जोरगेवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून उद्या 27 ऑक्टोबरला आमदार सुधीरभाऊं मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत किशोरभाऊचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश होण्याची शक्यता आहे एकूणच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत असून दिवाळी या गुलाबी थंडीत राजकीय धूळवळी सोबत शक्ती प्रदर्शनातून आपल अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करतील.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)