बल्लारपूरात उच्च शिक्षित तरुणीची जवळपास 31 लाख रुपयांनी फसवणूक, समाज माध्यमावर टास्क पूर्ण करणे पडले भारी (In Ballarpur, a highly educated young woman was defrauded of nearly Rs 31 lakh, the social media was tasked with completing the task)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात उच्च शिक्षित तरुणीची जवळपास 31 लाख रुपयांनी फसवणूक, समाज माध्यमावर टास्क पूर्ण करणे पडले भारी (In Ballarpur, a highly educated young woman was defrauded of nearly Rs 31 lakh, the social media was tasked with completing the task)


बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील उच्च शिक्षित महिलेची पोलीस केसची भीती दाखवत जवळपास ३१ लाख १५ हजार २२० रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून पोलीसांनी याविषयीं गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील फिर्यादी उच्च शिक्षित महिला असून त्यांनी २१ मे २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ चे दरम्यान फेसबुक या समाज माध्यमाचा वापर करित असतांना त्यांना घरबसल्या पैसे कमवा असा व्हिडीओ दिसुन आला. त्यावेळी तिने सदर व्हिडीओ पाहुन व्हिडिओ मध्ये सांगीतल्याप्रमाणे टेलीग्रॉम चॅनल फालो केले. त्यात तिला फॅशन संबंधीत कपडे, ज्वेलरी आाणि ईतर सामान यांचे व्हिडीओ बघुन स्क्रीन शॉट पाठविणे याबदल्यात प्रत्येकी स्क्रीन शॉट ५०/-रू. प्रमाणे टॉस्क देण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने एकुण १२ टॉस्क पुर्ण केले. त्याचे काही पैसे फिर्यादीत देवुन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर १३ टॉस्क पेड टास्क असल्याचे सांगुन तिला १२ हजार रुपये  पाठविण्यास सांगितले. त्यानंतर सातत्याने तिला तुमचे अकाऊंट होल्ड लागले अनफ्रिज करण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानंतर तिने पाठविलेली रक्कम जास्त असल्याचे सांगुन तिला सायबर पोलीस ठाणे तसेच इन्कम टॅक्स ची धमकी देवुन तिची फसवणुक करून वारंवार त्यांचेकडुन पैसे घेवुन २७ लाख ६० हजार ९८० रुपये ची आर्थिक फसवणुक केली. त्यानंतर सुध्दा तिला ४ हजार ८०० डॉलर पाठविले आहे. त्याचे भारतीय रूपयामध्ये रूपांतर करण्यासाठी ४ हजार रु. लागतील असे सांगुन तिच्याकडून रक्कम पाठविण्यास भाग पाडले. नंतर तिला धमकी दिली की तुमच्यावर मनी लॉन्ड्रीग, ब्लॅक मनी व तुमच्यावर पोलीस केस होईल याची भिती दाखवुन ३ लाख ५४ हजार २२० रुपये अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या घटनेत एकुण ३१ लाख १५ हजार २२० रुपयाची फसवणुक केली आहे. पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडिया वर येणारे व्हिडिओ तसेच अनोळखी कॉल पासून दोन हात लांब रहावे. आज काल सोशल मीडिया चा माध्यमातून लोकांना फसवणूकीचे गुन्हे जास्त प्रमाणत होत, असून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सदर उच्च शिक्षित महिलेने यासंदर्भात बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केले असून पोलीसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत ६६(क), ६६(ड), कलम ३१८(४) बी एन एस २०२३ ची गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील वी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)